तरुणांच्या मनातला प्रश्न : सलग दुसऱ्या वर्षीही निराशा होण्याची शक्यता
अमरावती : कोराेनावर मात करीत शालेय शिक्षण विभाग शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्यापही महाविद्यालये सुरू करण्याबाबत सूतोवाच केलेले नाही. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका नाही तर मग तरुणांना धोका कसा, असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आहे.
बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याचा मुद्दा पुढे येईल. यूजीसी व विद्यापीठाचे निर्देश जसे येतील, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आरडीआयके महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश देशमुख यांनी सांगितले.
बाॉक्स
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये: ११८
एकूण विद्यार्थी संख्या: ७२२४८
शाखानिहाय विद्यार्थी संख्या
कला: २३५९१
वाणिज्य: १४३७६
विज्ञान : १६८३४
कोट
प्राचार्यांची तयारी
३० ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षाच सुरू आहेत. शासनाने साधारण १५ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करण्यास सूचित केले आहे. त्यामुळे सध्या आम्ही ऑनलाईन शिक्षण देत आहोत. यात कुणीही आनंदी नसले तरी त्याविना सध्यातरी पर्याय नाही.
- आर.डी.सिकची, प्राचार्य
महाविद्यालये सुरू झालीच पाहिजेत. मात्र बीएससी, एमएससीच्या परीक्षा सुरू आहेत. बारावीचा निकाल आलेला नाही. या गोष्टी झाल्यानंतरच साधारणत: सप्टेंबरमध्ये नवीन सत्र सुरू होईल. तोपर्यंत शासनाचा निर्णयदेखील आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण वाट पाहू.
- दीपक धोटे, प्राचार्य
------------------
महाविद्यालये सुरू होण्याच्या विद्यार्थी प्रतीक्षेत
मागील वर्षीही महाविद्यालयात न जाताच परीक्षा द्याव्या लागल्या. कसेबसे पासही झालो. मात्र प्रत्यक्ष वर्गात बसून शिकण्याचे महत्त्व वेगळेच आहे. यंदा सत्र सुरू होऊन महिना लोटला. मात्र महाविद्यालय सुरू झालेले नाही.
- अंकुश पारखंङे, विद्यार्थी
महाविद्यालयीन स्तरावर स्वयंअध्ययनाला फार महत्त्व असते. मात्र त्याला प्राध्यापकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे. त्यासाठीच आमचे ऑफलाइन वर्ग तातडीने सुरू करावे, अन्यथा आणखी एक वर्ष वाया जाईल.
- संकेत देशमुख, विद्यार्थी