यशोमती ठाकूर : मोझरी गुरुकुंज नव्या बसस्थानकाचे लोकार्पणतिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी विकास आराखड्यातील मोझरी बसस्थानक हे एक मॉडेल बसस्थानक आहे. ही वास्तू आजपासून तुमची आहे, असे समजून या वास्तूला स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी तुमची असल्याचे प्रतिपादन आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी गुरुकुंज मोझरी येथे व्यक्त केले.मोझरी विकास आरखाड्यअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या मोझरी गुरुकुंज बसस्थानकाच्या नव्या वास्तूचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी फीत कापून उदघाटन केले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून आमदार यशोमती ठाकूर मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, जि.प. बांधकाम सभापती, जयंत देशमुख, जि.प. सदस्य अभिजित बोके, पूजा आमले, गौरी देशमुख, एसडीओ राम लथाड, तहसीलदार राम लंके, पुष्पा बोंडे, डॉ.रघुनाथ वाडेकर, पं. स. सभापती अर्चना वेरुळकर, पं. स. सदस्य लुकेश केने, सरपंच पांडुरंग मक्रमपुरे, विद्या बोडखे आदी उपस्थित होते.यशोमती ठाकूर म्हणाल्या, मोझरी विकास आराखड्यात ज्या इमारती साकारल्या जात आहेत. तसेच बांधकामही होत आहे. मोझरी बसस्थानक हे प्रवाशी, कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी एक सोयी-सुविधायुक्त असे बसस्थानक ठरेल. मोझरीच्या बसस्थानकाची कॉपी चंद्रपुरात केली जात आहे. यावेळी विभागीय नियंत्रक अडोकर व बांधकाम कंपनीचे पांडुरंग वराळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन विष्णू सोळके यांनी, तर प्रास्ताविक अडोकार यांनी केले. (वार्ताहर)परिवहन मंत्र्यांकडे मांडणार प्रस्ताव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीत साकारलेली ही सर्व सुविधायुक्त इमारत ही सुरक्षित, स्वच्छ व सुंदर कशी ठेवावे, असे आवाहन करून येथून लांब पल्ल्याच्या बसेस या शिर्डी, शेगाव व पंढरपूरकरिता सोडण्याकरिता आपण परिवहन मंत्र्यांकडे प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.मुख्यालयाला लाजविणारे बसस्थानक -अडसूळमोझरी गुरुकुंज येथे सोमवारी साकारलेल्या बसस्थानकाची इमारत जिल्हा बसस्थानकाला लाजवेल, अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे ते एक मॉडेल व आदर्श बसस्थानक असल्याचे समजून येथून शिर्डी, पंढरपूरला जाणाऱ्या बसेसही येथून सुटाव्यात, अशी अपेक्षा खा.आंनदराव अडसूळ यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
‘मोझरीचे बसस्थानक’ विकासाचे मॉडेल
By admin | Published: May 02, 2017 12:39 AM