सीएसआर फंडातून येथील विकासकामाला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असली तरी जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कामांना तांत्रिक मान्यता मिळालेली नसल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर दिवटे यांनी केला आहे. येथील विकासकामात शाळेचे बांधकाम झालेले आहे.
टिमटाळा रेल्वे स्टेशनला भुयारी मार्ग आवश्यक असल्याने तो तत्काळ मंजूर करण्यात यावा. गावातील स्मशानभूमी व शाळेला वालकंपाऊंड, गावातील अंतर्गत रस्ते व पांदण रस्ते मंजूर करण्यात यावे, तसेच ग्रंथालय बिल्डिंग बांधकाम व व्यायमशाळा, वृद्धआश्रम, तलावाजवळ पर्यटनस्थळ विकसित करणे, गावाला एकनाथ रानडे यांच्या नावे प्रवेशव्दार बांधणे, जुन्या ठिकाणी बसस्टाप बांधणे, अंजनगाव बारी ते अडगाव बु. रोडवर पूल बांधकाम करणे, येथील शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी मंजूर करून विहीर दुरुस्तीचा लाभ द्यावा. रमाई व शबरी व प्रपत्र ड मधील लाभार्थी यांना प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. नियमित योजना उदाहरणार्थ चौदाव्या वित्त आयोगाचे व पंधराव्या वित्त आयोगाची कामे राबविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी अडगाव बु.चे नागरिक मोरेश्वर दिवटे, ज्ञानेशव दिवटे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश परिमल, प्रफुल्ल परिमल, कल्याणी दिवटे, गोविंद वरकड, मनोज खोब्रागडे, प्रवीण जाधव, रवींद्र परिमल, नीलेश गांडोळे, राम शिन्दे, प्रदीप अडगावकर, किसन हायगले, सचिन टेकरवाडे, रत्नाकर शिंदे, नबाबसिंग मोहोड, जगदीश बारबैले, माजी सरपंच अंबादास पडोळे, सुरेश दिवटे, माजी सरपंच विजय परिमल, मनीष मदनकार आदींनी केली आहे.
===Photopath===
270621\img-20210625-wa0019.jpg
===Caption===
अडगाव बु. येथील बांधकाम करण्यात आलेली शाळेची इमारत. इतर विकास कामाची प्रतिक्षा.