प्रदीप भाकरे, अमरावती : येथील कुख्यात गुन्हेगार दर्शन विलास महल्ले वय 22 वर्ष रा.शिवाजी चौक, नवसारी, अमरावती) याचेविरुद्ध एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
दर्शन महल्ले हा सन 2022 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचे विरूध्द गाडगेनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, दरवडया बद्दल शिक्षा, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याचा प्रयत्नासहीत जबरी चोरी किंवा दरोडा , गृह अतिक्रमण करणे, बलादग्रहणाबद्दल शिक्षा, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला क्षती पोचवण्याची भीती घालणे, दुखापत करणे, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याची धमकी, मानवी किंवा इतरांच्या व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल अशी कृती करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, पन्नास रूपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक करणे, एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशिर गिरफदारीला प्रतिकार किंवा अटकाव करणे, अश्लील कृती करणे, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटबद्दल शिक्षा, दोन किंवा अधीक व्यक्तींनी समान उद्देशाच्या पुरःसरणार्थ केलेल्या कृती, अवैध्य शस्त्र बाळगणे, अग्णीशस्त्र बाळगणे अधिसुचनांचे उलघंन करणे, हद्दपार आदेशाचे उल्लघंन करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहे. त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवई करण्यात आलेले आहे. तसेच त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सकीय आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गाडगेनगरचे ठाणेदार प्रशांत माने यांनी पोलीस आयुक्तालयात प्रस्ताव पाठवला. त्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी १४ ऑक्टोबर रोजी आदेश पारीत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो.स्टे. गाडगेनगर मार्फत आदेश तामिल करून त्यास स्थानबध्दतेच्या कालावधी करीता मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे १५ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले आहे. यापुढेही शहरातील सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयाखाली कारवाई करण्यात येणार आहे.