शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

Kerala Floods: केरळच्या मदतीसाठी खासदारांना एक कोटींच्या निधीची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 6:23 PM

Kerala Floods: केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागाचे मंत्री डी.वी.सदानंद गौडा यांनी २४ आॅगस्ट रोजी खासदारांना पत्र पाठविले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने केरळ येथे उद्भवलेल्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी संसद सदस्य स्थानिक क्षेत्रविकास योजना (एमपीलॅण्डस) राज्यसभा समितीची बैठक घेतली. मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जिवितहानी केरळ राज्याला सोसावी लागली. परिणामी केंद्र सरकारकडून केरळचा महापूर ‘भीषण नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्यात आली. त्यामुळे एमपीलॅण्डस दिशा निर्देशाच्या अनुक्रमांक २.८ अन्वये देशाच्या कोणत्याही भागात ‘भीषण नैसर्गिक आपत्ती’ स्थिती आल्यास खासदारांना त्यांच्या निधीतून प्रभावित जिल्ह्यांसाठी कमीतकमी एक कोटी निधीची विकासकामे प्रस्तावित करता येते. त्याअनुषंगाने ना. डी.वी. सदानंद गौडा यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्यांना पत्र पाठवून केरळच्या पुनर्वसनासाठी मदतीची हाक दिली आहे. खासदारांनी एमपीलॅण्डसमधून एक कोटी रुपयांचा निधी वापराचे सहमतीपत्र देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. निधी वापराचे नाहरकत                                                                             पत्र खासदारांनी आॅनलाईन देण्याच्या सूचना आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने केरळच्या मदतीसाठी एमपीलॅण्डस निधीबाबतची माहिती संबंधित जिल्हाधिकाºयांकडून घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. आॅगस्टअखेरपर्यंत व्यक्ती, संस्थांकडून केरळसाठी रोख व वस्तुरूपात ५३७ कोटींची मदत झाली आहे. राज्यसभेचे २५०, तर लोकसभेचे ५४५ सदस्यांकडून निधी मागितला आहे. खासदारांना मेल अथवा संपर्क साधून निधी मान्यतेचे पत्र मिळविले जात आहे.

केंद्र सरकारकडे २६०० कोटींची मागणीकेरळ राज्यात पूर आणि पावसाने २० हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ३० आॅगस्ट रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेऊन नैसर्गिक आपत्तीवर चर्चा केली. केरळला नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे २६०० कोटी रूपयांचे विशेष आर्थिक साहाय्य मागण्यात आले आहे.           

केरळचे संकट हे दुर्देवी आहे. मात्र, महाराष्ट्रात काही वर्षांपासून अस्मानी संकट, सततच्या नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केरळच्या धर्तीवर राज्याच्या शेतकºयांसाठी विशेष पॅकेज द्यावे. अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झाला नसून, त्याकरिता सकारात्मक निर्णय व्हावा.- आनंदराव अडसूळ,खासदार, अमरावती

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर