लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात सोायाबीनची क्षेत्रवाढ झाल्याने बियाण्यांची मागणी वाढली. टंचाई असल्याने महाबीजनेही मध्यप्रदेशातून बियाणे आणले . मात्र यापैकी काही बॅगच्या टॅगवर उगवणशक्ती तपासणी, बीज प्रमाणिकरणाचा कोणताही उल्लेख नसतांना महाबीजचा शिक्का मारून शेतकऱ्यांच्या माथी मारले. या बियाण्यांची उगवण कमी असल्याने शेतकºयांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.दर्यापूर तालुक्यात महाबीजद्वारा मध्यप्रदेशातील सुंदरम कंपनीचे बियाणे विक्री करण्यात आले. बियाण्यांच्या बॅगवर या कंपनीचे टॅग लागलेले आहेत. विशेष म्हणजे यावर बियाण्यांच्या प्रमाणिकरण प्रमाणपत्र व बीज परिक्षणाच्या तारखेचा उल्लेख नाही. केवळ मध्यप्रदेशातील भोपाळ येथील मध्यप्रदेश राज्य बीज प्रमाणिकरण संस्था असा उल्लेख आहे. महाबीजद्वारा हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून खरेदी केले. मात्र दोन आठवड्यानंतरही उगवण न झाल्याने महाबीजने घात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे अडीच लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे कल अधिक आहे. उशिरा पावसाने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग, उडदाचे पीक बाद होवून सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे बाजारात सोायाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले. अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजसह इतरही खासगी कंपन्यांच्या विरोधात शेतकºयांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळे महाबीजने बियाणे उपलब्ध करून भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.कृषी विभाग करणार का पोलीस केस ?कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार ,बियाणे नकली असल्यास, किंवा बियाण्यांची फसवणूक करीत असल्यास किंवा एखाद्या कंपनीच्या नावाने नकली बियाणे विक्री करीत असल्यास अशा प्रकरणांमध्ये पोलीस केस दाखल करण्यात याव्यात व उर्वरित प्रकरणात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश, १९८३ अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शेतकºयांची बियाण्यांमध्ये फसवणूक झाली असल्याने कृषी विभाग कृषी आयुक्तांचे आदेश समजून पोलीस कारवाई करणार का, असा शेतकºयांचा सवाल आहे.बातम्या आल्यानेच तक्रारी वाढल्याचा जावईशोधमहाबीजने यंदा ४० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची विक्री केली त्यातुलनेत केवळ अर्धा- एक टक्का शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. केवळ महाबीजचे नव्हे तर इतरही खासगी कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मात्र, माध्यमांद्वारे बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्यामुळेच शेतकऱ्यांद्वारे तक्रारींचा ओघ वाढत असल्याचा जावईशोध महाबीजचे अधिकाºयांनीं लावला आहे. काही तालुक्यातच तक्रारी दाखल झाल्या असल्याचे त्यांनी सांगीतले.टॅगवर सर्व उल्लेख बंधनकारक आहेत. एखाद्या बॅगवर अनावधानाने उल्लेख राहून जातो. काही तालुक्यात सोयाबीन संदर्भात तक्रारी आहेत. जिल्हास्तरीय समितीद्वारे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.- प्रवीण देशमुखजिल्हा व्यवस्थापक, महाबीज
एमपीचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांची माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:22 PM
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात सोायाबीनची क्षेत्रवाढ झाल्याने बियाण्यांची मागणी वाढली. टंचाई असल्याने महाबीजनेही मध्यप्रदेशातून बियाणे आणले . मात्र यापैकी काही बॅगच्या टॅगवर उगवणशक्ती तपासणी, बीज प्रमाणिकरणाचा कोणताही उल्लेख नसतांना महाबीजचा शिक्का मारून शेतकऱ्यांच्या माथी मारले. या बियाण्यांची उगवण कमी असल्याने शेतकºयांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.दर्यापूर तालुक्यात ...
ठळक मुद्देबीज प्रमाणिकरणाचा टॅगवर उल्लेख नाही : महाबीजद्वारा फसवणूक झाल्याचा आरोप