आॅनलाईन लोकमतचिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारिदा परिसरात मंगळवारी सकाळी ९ वाजता वादळासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. परिणामी वातावरणात पूर्णत: गारवा पसरला. परिसरातील नदी, नाले खळखळून वाहू लागले. गारपिटीने परिसर बर्फाच्छदित झाला. आदिवासींच्या शेतातील गहू आणि हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह, अतिदुर्गम हतरु खडीमल, दहेंद्री काटकुंभ, चुरणी, माखला, घटांग परिसरात मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत तब्बल दोन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोबतच गारपीट झाल्याने संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झाला होता. वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने परतवाडा-खंडवा महामार्गावरील घटांग, सेमाडोह, हरिसालपर्यंत रस्त्यावर झाडांचा पालापाचोळा गारांचा ढीग, काळोख व पाऊस कोसळल्याने महामार्ग ठप्प पडला होता.मंगळवारी महाशिवारात्री असल्याने मध्यप्रदेशच्या ओंकारेश्वर येथे जाणाऱ्या शिवभक्तांसह पर्यटकांना रस्त्यावरच काही वेळ थांबावे लागले. पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने नदी, नाले वाहू लागल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी निंबूच्या आकाराच्या गारा पडल्यामुळे घरावरील कवेलू फुटले. त्यामुळे घराला गळती लागली आहे.अमरावतीतही वादळी पावसासह गारपीटअमरावती : जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाले. सोमवारी शहरातील काही भागात पावसासह बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने नागरिकांची भंबेरी उडाली. १४ फेब्रुवारीपर्यंत हीच स्थित राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांंनी व्यक्त केला. शहरालगच्या बडनेरा, भानखेडा, अकोली परिसरात गाराचा वर्षाव झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडाली होती. वलगाव ते बडनेरा रींग रोड स्थित पकंज सुने यांच्या शेतशिवारात गारांचा खच पडला असून शहरातील काही भागात व शहरालगतच्या शेतशिवारांमध्ये गारा पडल्या.परिसरातील विलोभनीय दृश्यचिखलदरा, सेमाडोह या पर्यटन स्थळावर गारवा पसरला असून तापमानात घट झाली आहे. अचानक नदी नाले, वाहू लागल्याने विलोभनीय दृश्य पर्यटकांना मोहित करणारे ठरले आहे. गारांचा थर बाजूला करण्यासाठी आदिवासींना तो पावड्याने सरकावा लागला. तर मेळघाटात दाट धुके, काळोख अद्भूत नजाºयाचा आनंद पर्यटक घेताना दिसले.सेमाडोह, हातरु, काटकुंभ परिसरात मुसळधार, गारपीट झाली. घरांचे छत, गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले. त्यांची माहिती घेतली जात आहे. अप्रिय घटना कुठेच घडलेली नाही. - प्रदीप पवार, तहसीलदार
चिखलदऱ्यात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:34 PM
तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारिदा परिसरात मंगळवारी सकाळी ९ वाजता वादळासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. परिणामी वातावरणात पूर्णत: गारवा पसरला.
ठळक मुद्देपारा घसरला : नदी, नाले वाहू लागले, मेळघाट बर्फाच्छादित, गहू, हरभऱ्याचे नुकसान