लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मदरशातील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणारा मुफ्ती जियाउल्ला खान हा ‘बाबागिरी’तही दबदबा राखून असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यादृष्टीने त्याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाईबाबत नागपुरी गेट पोलिसांकडून प्रयत्न होत आहेत.लालखडी रिंंगरोडवर जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात या मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला पोलिसांनी मंगळवारी रात्री नागपूर येथून अटक करून अमरावतीला आणले. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांत त्याच्यासह गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या फिरदौस नामक महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (एन), ३७६ (अ) (ब) (ड), ३४२, ३२३,, ५०६, ३४ व ६, ६, १७ पोक्सो अन्वये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाशी संबंधित चौकशीदरम्यान पोलिसांना जियाउल्ला खानच्या अनेक कारनाम्यांची माहिती मिळाली.दरम्यान, राजापेठ पोलीस ठाण्यात जियाउल्लाचे गुरुवारी बयाण नोंदविण्यात आले. त्याने केलेल्या कृत्याबाबतचे आरोप त्याने नाकारले. चौकशीदरम्यान मदरशाच्या बाजूला असलेल्या खासगी खोलीत तो भूत, भानामतीच्या ‘केस’ घेत असे, अशी माहिती पुढे आली आहे. त्याच्याकडे येणाºया कथित पीडितांना मंतरलेले पाणी शिंपडण्यापासून विविध कृत्यातून तो स्वत:च्या तथाकथित ‘बाबागिरी’चे प्रदर्शन करीत होता. अंधश्रद्धेने पछाडलेली ‘भक्तमंडळी’मुळे त्याचे परिसरात प्रस्थ वाढले होते. प्रकरणात नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा तपास सुरू आहे.पाच मदरशांची मालकीमुफ्ती जियाउल्ला खान याच्याकडील बेनामी संपत्ती व संस्थांबाबतही पोलीस माहिती काढत आहेत. त्याच्या मालकीचे पाच मदरसे व अन्य शैक्षणिक संस्थादेखील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ज्या मदरशात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण घडले, त्यामध्ये २७६ मुली असून, त्यापैकी मोठी संख्या अनाथ मुलींची आहे.प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्याची तक्रारदाराची मागणीनागपुरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लैंगित अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला जावा, अशी मागणी पीडिताच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांना गुरुवारी दिलेल्या निवेदनातून केला आहे. आरोपी मुफ्ती जियाउल्ला खान हा नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून, धर्मगुरू असल्याने त्याचे अनेक अनुयायी आहेत. पोलीस ठाण्यात ये-जा करतेवेळी त्यांच्याकडून त्रस्त केले जाते तसेच काही जण धर्माची द्वाही देत दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हे प्रकरण नागपुरी गेट पोलीस ठाण्याकडून काढून त्याचा तपास गुन्हे शाखेला सोपविण्यात यावा, असे तक्रारदार पित्याने निवेदनात नमूद केले.
लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुफ्तीचा ‘बाबागिरी’तही हातखंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:00 AM
लालखडी रिंंगरोडवर जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात या मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला पोलिसांनी मंगळवारी रात्री नागपूर येथून अटक करून अमरावतीला आणले. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांत त्याच्यासह गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या फिरदौस नामक महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (एन), ३७६ (अ) (ब) (ड), ३४२, ३२३,, ५०६, ३४ व ६, ६, १७ पोक्सो अन्वये गुन्हे दाखल आहेत.
ठळक मुद्देअनेक मदरशांची मालकी : जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याची चाचपणी