शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

दसऱ्याला कापूस खरेदीचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 9:50 PM

जिल्ह्यातील कपाशी लागवडीला जुलैचा दुसरा आठवडा उजाडल्यामुळे यंदा कापसाच्या हंगामाला उशिरा सुरुवात होणार आहे. या पार्श्वभुमीवर ‘सीसीआय’द्वारा दसºयाला तीन केंद्रांवर खरेदीचा मुहूर्त साधणार आहे. केंद्राने कापसाच्या हमीभावात यंदा एक हजार रुपयांची घसघशीत वाढ केल्यामुळे पणन महासंघाला यंदा सुगीचे दिवस येणार आहेत. सीसीआयची अभिकर्ता असलेल्या पणन महासंघाद्वारा यंदा सहा केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे.

ठळक मुद्देनऊ केंद्रांवर खरेदी : हमीभाव वाढीमुळे ‘पणन’ला येणार सुगीचे दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील कपाशी लागवडीला जुलैचा दुसरा आठवडा उजाडल्यामुळे यंदा कापसाच्या हंगामाला उशिरा सुरुवात होणार आहे. या पार्श्वभुमीवर ‘सीसीआय’द्वारा दसऱ्याला तीन केंद्रांवर खरेदीचा मुहूर्त साधणार आहे. केंद्राने कापसाच्या हमीभावात यंदा एक हजार रुपयांची घसघशीत वाढ केल्यामुळे पणन महासंघाला यंदा सुगीचे दिवस येणार आहेत. सीसीआयची अभिकर्ता असलेल्या पणन महासंघाद्वारा यंदा सहा केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे.यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रकोप झाल्यामुळे यंदा बागायती कपाशीची लागवड नगण्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कापूस वेचणीला सुरुवात नाही. मात्र, दसऱ्यानंतर वेचणीला सुरुवात होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) द्वारा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सीसीआयद्वारा राज्यात ६४ केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे व येत्या १५ आॅक्टोबरला खरेदी सुरू करण्याचे सुतोवाच प्रधान कार्यालयाद्वारा करण्यात आले. जिल्ह्यात सीसीआयद्वारा धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व तळेगाव दशासर येथे केंद्रे राहणार आहेत. अद्याप कापूस वेचणीला सुरुवात न झाल्यामुळे सीसीआय दसरा व पणन महासंघ धनत्रयोदशीचा मुहूर्त साधणार असल्याची माहिती आहे.मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आवक कमी असल्याने व खासगी बाजारात हमीपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनाच कापूस विकला. त्यामुळे सीसीआय व पणनच्या केंद्रावर उद्घाटनाही कापूस मिळाला नव्हता. यंदा स्थिती विपरीत आहे. केंद्र शासनाने लांब धाग्याच्या कापसाला ५४५० रूपये भाव दिल्याने खरेदी केंद्रांना सुगीचे दिवस येणार आहे.टेंडर रिकॉलनंतर ‘पणन’ची प्रक्रिया‘सीसीआय’ची सबएजंट असणाºया पणन महासंघाद्वारा अमरावती, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा व वरूड येथे केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिनिंग व प्रेसींग केंद्रासाठी निविदा बोलाविण्यात आल्यात. मात्र, एकाही प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची त्रुटी तसेच दरदेखील नमूद नसल्यामुळे टेंडर रिकॉल करण्यात आले आहेत. त्यामुळे पणन दसºयाचा मुहूर्त साधणार नसल्याचे चित्र आहे.‘पणन’ला तीन महिन्यांची मुदतकॉटन कॉरर्पोरेशन आॅफ इंडियाची अभिकर्ता म्हणून पणन महासंघाला तीन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने कापसाचा हंगाम हा दिवाळीपश्चातच सुरू होतो. त्यामुळे अगोदर केंद्र सुरू करून ऐन हंगामाच्या काळात बंद होऊ नये, यासाठी सीसीआयच्या तुलनेत पणन महासंघाद्वारा खरेदीची प्रक्रिया उशिरा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.व्यापाऱ्यांद्वारे पितृपक्षानंतर खरेदीगणपती विसर्जनानंतर पितृपक्ष सुरू होतो व पंधरा दिवसानंतर शारदीय नवरात्र सुरू होण्याच्या आदल्या दिवशी समाप्त होतो. या अवधीत व्यापारी बहुधा खरेदीचा मुहूर्त साधत नसल्यामुळे दसºयाच्या दिवशीच व्यापारी व खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा कपाशीची लागवडदेखील उशीराच झाली व धूळपेरणी नसल्यामुळे अद्याप कापूस वेचणी सुरू झालेली नाही.पणन महासंघाद्वारा जिल्ह्यात सहा केंद्रांवर खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. काही तांत्रिक कारणांंमुळे निविदाची पुनर्प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आदेश येताच केंद्र सुरू केले जातील.- डी. यू. कांबळे, विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघजिल्ह्यात खरेदी केंद्राची प्रक्रिया सुरू आहे. यंदा हमीभावात वाढ झाल्याने सर्वाधिक कापूस खरेदी पणन महासंघाच्या केंद्रावरच होईल. दसऱ्यानंतर सहा खरेदी केंद्रे सुरू होतील. याबाबत आदेशाची प्रतीक्षा आहे.- छाया दंडाळे, संचालक, पणन महासंघ, मुंबई