लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांचे मानसपुत्री वैशाली व अनिल यांचा विवाहाचा मुहूर्त निघाला असून, येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्मृतिस्थळाच्या खुल्या स्टेडीयममध्ये सनई चौघडे वाजणार आहे. राष्ट्रीय विवाह सोहळ्याच्या निमित्ताने बेवारस दिव्यांगांना आजीवन रिमांड तसेच त्यांना बालगृहात राहू द्यावे, असा कायदा सरकारने करावा, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेतून शंकरबाबा पापळकर यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस बालगृह १९९० पासून कार्यरत आहे. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या पुढाकारातून तेथे अपंग व बेवारसांचे पुनर्वसनाचे कार्य अविरत सुरू आहे. या बालगृहातील शंकरबाबा यांची मानसपुत्री वैशाली व पुत्र अनिल यांचा विवाह आयोजित केला आहे. या विवाहात खासदार आनंदराव अडसूळ व त्यांची पत्नी मंगला आनंदराव अडसूळ वैशालीचे कन्यादान करणार असून, वर अनिल यांच्या पित्याचे दायित्व अमरावती शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व त्यांच्या पत्नी रंजना बाविस्कर यांनी स्वीकारले आहे. प्रभाकरराव वैद्य यांनी या विवाह समारंभासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे स्मृतिस्थळ मैदानावर व्यवस्थापनाची जवाबदारी स्वीकारली असून, ज्येष्ठ नेत्या कमलताई दादासाहेब गवई वर-वधुस आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मुलाच्या मामाची भूमिका विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंह व मुलीची मावशी म्हणून आमदार यशोमती ठाकूर, मुलाचे मोठे भाऊ जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुलीचे मोठे भाऊ शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, मुलीचे काका पुरुषोत्तम हरवाणी आणि मुलीच्या मामाची जबाबदारी शिवप्रभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भालेराव यांनी स्वीकारली आहे.अनाथ मंतिमंद मुला-मुलींना आजीवन राहू द्यावज्झर येथे अपंग मुलांचे पुनर्वसन होत आहे. या बालगृहात एकूण १२३ मुलांचे आजीवन पुनर्वसन केल्या जात आहे. हे सर्व मुले महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात बेवारस स्थितीत वयाच्या १ ते २ वषार्चे असतांना सापडले. त्यांना पूनर्वसनासाठी या बालगृहात दाखल केले गेले. मात्र, १८ वर्षे झाल्यानंतर या सर्व मुलांना बालगृहाच्या बाहेर काढा, असा शासकीय नियम आहे. परंतु समाजाचा, सरकारी अधिकाऱ्यांचे व राजकीय नेत्यांचे सहकार्यांनी या मुलांना आजिवन येथे ठेवल्या जात आहे. भारतात दरवर्षी १ लाख विकलांग मुले-मुली वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर रिमांड होम (बालगृहाच्या) बाहेर काढले जातात. त्यांचे पुढे काय होते, याची शासनाजवळही नोंद नाही. त्यामुळे अशा मुला-मुलींना आजीवन बालगृहात राहू देण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली.दिग्गज मंत्र्यांची मांदियाळीया विवाह समारंभासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, समाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार गजानन कीर्तीकर, खासदार भावना गवळी, ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, महापौर संजय नरवणे, आ. अरुण अडसड, बच्चू कडू, विरेंद्रजी जगताप, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदेले अनिल बोंडे, हर्षवर्धन सपकाळ, सुनीता फिसके, शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राधेश्यामजी चांडक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडकेंसह शेकडो नेत्यांची मांदियाळी राहणार आहे.शिवप्रभू प्रतिष्ठानातर्फे मराठी गझल गीतपुणे येथील शिवप्रभू प्रतिष्ठानच्यावतीने अनाथ मूकबधिरांच्या विवाहाप्रसंगी सोबतीचा करार मराठी गझल गीत व कवितांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कवी वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे व संगीतकार आशिष मुजुमदार हे सादर करणार आहेत.शेगाव संस्थानकडून महाप्रसादश्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या सहयोगाने या विवाह समारंभासाठी विश्वस्त आदरनीय शिवशंकर पाटील यांच्यावतीने महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
मुहूर्त निघाला : ९ फेब्रुवारीला वाजणार सनई चौघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 10:59 PM
अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांचे मानसपुत्री वैशाली व अनिल यांचा विवाहाचा मुहूर्त निघाला असून, येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्मृतिस्थळाच्या खुल्या स्टेडीयममध्ये सनई चौघडे वाजणार आहे.
ठळक मुद्देपत्रपरिषद : शंकरबाबा यांच्या मानसपुत्री वैशाली संग अनिल यांचा विवाह