शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

८६० घरांची निर्मिती महापालिका राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:00 AM

केंद्र शासनाने जून २०१६ मध्ये सुरू केलेली योजना अमरावती महापालिकेत मार्च २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये चार घटकांतर्गत नागरिकांना घरांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेत घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थी मंजूर आहेत. यापैकी ११५० लाभार्थींचा प्रकल्प शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजना । ५,३६९ लाभार्थींना मिळणार घरकुलाचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत घटक क्र. ३ मध्ये महापालिकाद्वारे ८६० घरांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थींना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे. या लाभार्थींना ३२३ चौरस फुटाचे घर बांधकामासाठी प्रतिलाभार्थी अडीच लाखांचे अनुदान देण्यात येत आहे. योजनेचे काम धडाक्यात सुरू असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांमध्ये अमरावती महापालिका राज्यात अव्वल असल्याची गौरवाची बाब आहे.केंद्र शासनाने जून २०१६ मध्ये सुरू केलेली योजना अमरावती महापालिकेत मार्च २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये चार घटकांतर्गत नागरिकांना घरांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेत घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थी मंजूर आहेत. यापैकी ११५० लाभार्थींचा प्रकल्प शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. महापालिका हद्दीमध्ये मंजूर डीपीआरमधील १२०० घरे पूर्ण करण्यात आली व काही घरकुलांचे नकाशे मंजुरी प्रक्रियेत असल्याची माहिती या योजनेचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी दिली. याव्यतिरिक्तही शासकीय जागेवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे (जानेवारी २०११ पूर्वीची) नियमानुकूल करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आलेली आहे. कच्चे घरकुल असलेल्या अतिक्रमणधारकास पट्टावाटप करून घरकुलाचा लाभ देण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.महापालिका हद्दीतील गावठाण क्षेत्रामध्ये गरजू लाभार्थींना सलग तीन वर्षांच्या टॅक्स पावतीवर २० आॅक्टोबर २०१८ च्या शासनादेशान्वये घरकुलांचा लाभ देण्यात येत आहे. या परिपत्रकान्वये पीआर कार्ड सक्तीचे नाही, हे येथे उल्लेखनीय. विशेष म्हणजे, या योजनेचा प्रचार व प्रसारासाठी शेगाव व रहाटगाव परिसरात दोन वेळा शिबिरेदेखील घेण्यात आलेली आहेत. आयुक्त संजय निपाणे यांचेद्वार या योजनेचा सातत्याने आढावा घेण्यात आल्यानेदेखील योजनेची कामे गतिमान झालेली आहेत.हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा जिल्हा आढावा घेत समाधान व्यक्त केले होते, हे येथे उल्लेखनीय.योजनेत चार घटकांचा समावेशपंतप्रधान आवास योजनेमध्ये चार घटकांद्वारे नागरिकांना घरांचा लाभ मिळू शकतो. यात घटक-१ मध्ये झोपडपट्टींचा आहे तिथेच पुनर्विकास करणे, घटक-२ मध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्पउत्पन्न घटकांसाठी घरे, घटक-३ मध्ये खासगी भागीदारीतून परवडणाऱ्या घरांची निर्मिती व घटक-४ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थींद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास मदत करण्यात येत आहे.या क्षेत्रात होणार घरांची निर्मितीमहापालिका हद्दीत घटक-३ मध्ये मौजा बडनेरा, बेनोडा, निंभोरा, नवसारी, तारखेडा, म्हसला, रहाटगाव येथील भूखंडाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सदनिकेची किंमत ही साधारणपणे १० लाखांच्या दरम्यान राहणार आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा अंदाजे ६.५० लाखांचा राहणार आहे. २१६ सदनिकेचे बांधकाम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. ७५२ लाभार्थ्यांकडून डीडीच्या स्वरूपात ४९ हजार रुपये प्रतिअर्जदार अनामत रक्कम जमा करण्यात आल्याचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका