शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

महापालिकेत ८० कोटींचा अपहार!

By admin | Published: April 19, 2015 12:10 AM

महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत.

पत्रपरिषद : सुनील देशमुख यांचा आरोप, शासन अनुदानाची उधळपट्टीअमरावती : महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत. यात सुमारे ८० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. यासाठी अभियंते, कंत्राटदार आणि अधिकारी दोषी आहेत. गुणवत्ता पडताळणीच्या अहवालानुसार ही बाब स्पष्ट झाल्यामुळे दोषींवर आता थेट कारवाई अपेक्षित आहे. तसे न झाल्यास सिव्हील कोर्टात जाऊन फौजदारी दाखल करु, असा इशारा आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी येथे दिला.येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आ. देशमुखांनी केलेल्या आरोपानुसार विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारदरम्यान फिरत असताना झालेल्या विकासकामांबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्यात. रस्ते निर्मिती, डांबरीकरण, सिमेंट, काँक्रीटीकरणाच्या विविध कामांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले. रस्ते निर्मिती, डांबरीकरणाच्या कामात तर प्रचंड घोटाळे झाल्याचा आरोप यावेळी देशमुखांनी केला. निवडणुकीच्या निकालानंतर जी कामे झालीत, त्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे ठरविले. तत्कालीन आयुक्तांच्या नावे पत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडून प्रायोगिक तत्त्वावर १० रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे शुल्क भरण्यात आले. बेलोरा विमानतळ, इर्विन, वाहतुकीवरही चर्चानिवडणुकीनंतर पहिल्यांदाच पत्रपरिषद घेऊन शहराच्या विकासात्मक विषयांवर जाहीरपणे मत प्रदर्शित करणाऱ्या आ. सुनील देशमुखांनी बेलोरा विमानतळ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाहतूक समस्येवरही चर्चा केली. बेलोरा विमातळाचा प्रश्न सोडविण्यासाठी २३ व २४ एप्रिल रोजी सर्वच आमदारांची बैठक होऊ घातली आहे. मुंबईकडे ये-जा करण्यासाठी विमानसेवा सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे. इर्विन रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन, एमआयआरची उपलब्धता तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहू, असे आ. देशमुख म्हणाले. विद्यापीठ गुणवाढ प्रकरणी खरा सूत्रधार पोलिसांनी पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.विकास कामांना दर्जा असलाच पाहिजे. यापूर्वी माझ्या प्रभागातील गोपालनगर ते एमआयडीसी रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार प्रशासनाकडे स्वत: दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. आ. देशमुखांनी उचललेले पाऊल नागरिकांच्या हिताचेच आहे.-चरणजितकौर नंदा, महापौर, महापालिका.शासन निधीतील कामांची चौकशी झालीच पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी. गुणवत्ता तपासणीमुळे मस्तवाल कंत्राटदारांना वठणीवर आणता येईल. अधिकारी, कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावणे सोयीचे होईल. आ. देशमुखांचे पाऊल स्वागतार्हच म्हणावे लागेल. -बबलू शेखावत, पक्षनेता, काँग्रेस.