लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवनियुक्त मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी सोमवारी १० वाजता महानगरपालिका मुख्य इमारतीमधील संपूर्ण विभागांची पाहणी केली.लेखा विभाग, प्रकाश विभाग, संगणक विभाग, सांख्यिकी विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जनसंपर्क विभाग, सहायक संचालक नगर रचना, एन.यू.एल.एम. विभाग, आॅडिट विभाग, नगरसचिव विभाग, भांडार विभाग, निवडणूक विभाग, पाणीपुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता-२, एल.बी.टी. विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, जन्म-मृत्यू विभाग, स्वास्थ्य विभाग, उद्यान विभाग, पशुशल्य विभाग, अभिलेखागार विभाग, विधी विभाग आदींचा समावेश आहे.आयुक्त संजय निपाणे यांनी विभागप्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबाबत सूचना दिल्या. कार्यालयाची नियमित साफसफाई करावी व दस्तावेजांवर धूळ बसता कामा नये. जुनी कागदपत्रे वर्गवारी करून शासननिर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी. अस्ताव्यस्त साहित्य व्यवस्थित लावावे. अधिकाऱ्यांची नावे विभागाच्या दर्शनी भागात लावण्यात यावी. कपाटे स्वच्छ करण्यात यावी. काही विभागांना त्वरित सुधारणा करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या. कोणालाही भिंतीवर थुंकू देऊ नये व संपूर्ण भिंती स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. सुट्टीचा अर्ज मंजूर करून द्यावा व त्यांची माहिती मनपा आयुक्तांना देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभागाने दोन पेजवर माहिती देण्याचे निर्देश दिलेत. मनपातील स्वच्छतागृहे त्वरित साफ करण्याचे निर्देश दिले. प्रभारी उपायुक्तद्वय नरेंद्र वानखडे, महेश देशमुख, एमओएच डॉ. सीमा नैताम, विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण, सांख्यिकी अधिकारी योगेश पिठे यावेळी उपस्थित होते.विभागनिहाय आढावादुपारच्या सत्रात आयुक्तांनी कर, सामान्य प्रशासन विभाग आणि लेखा विभागाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी वर्तमान स्थिती जाणून घेतली. आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम व जीएडी संबंधित प्रशासकीय कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती आहे.
नव्या आयुक्तांकडून महापालिकेची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:47 PM
नवनियुक्त मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी सोमवारी १० वाजता महानगरपालिका मुख्य इमारतीमधील संपूर्ण विभागांची पाहणी केली.
ठळक मुद्देविभागप्रमुखांचा क्लास : स्वच्छता, रिझल्टवर भर