शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

 महापालिकेचे लॉ ऑफिसर ‘सो बिझी’! एक पाय पालिकेत, दुसरा नागपूर उच्च न्यायालयात

By प्रदीप भाकरे | Published: May 08, 2023 5:46 PM

Amravati News महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना प्रशासक म्हणून जितका कामाचा व्याप नसेल, त्याहून कैकपटीने पालिकेचे विधी अधिकारी बिझी झाले आहेत.

प्रदीप भाकरेअमरावती: महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना प्रशासक म्हणून जितका कामाचा व्याप नसेल, त्याहून कैकपटीने पालिकेचे विधी अधिकारी बिझी झाले आहेत. कुठल्याही विभागप्रमुखांच्या तुलनेत त्यांच्या कामाचा व्याप अधिकच वाढल्याने महापालिकेचे लॉ ऑफिसर ‘सो बिझी’! असे म्हटले जात असून, त्यांचा एक पाय महापालिकेत तर दुसरा न्यायालयात असल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे.

             महापालिकेच्या इतिहासात कधी नव्हे, ती चार चार प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली आहेत. त्या प्रकरणात महापालिका प्रशासनाचा ‘से’ दाखल करताना लॉ ऑफिसर घायकुतीस आले आहेत. बाजार परवाना विभागाशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना आता स्वच्छता कंत्राट, मनुष्यबळ कंत्राट, मल्टिप्लेक्स व शहर बसचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे. त्यावर त्यांनाच महापालिकेची भूमिका ‘से’ लेखी स्वरूपात दाखल करावयाचा असतो. चारही प्रकरणे भिन्न स्वरूपाची असल्याने त्यांना प्रत्येक प्रकरणार एक्स्ट्रा एफटर्स घ्यावे लागत आहेत. संबंधित विभागाकडून त्या प्रकरणाच्या संपुर्ण नस्ती, पत्रव्यवहार, वर्कऑर्डर, ॲग्रीमेंट व अनुषंगिक सर्व बाबींचा अभ्यास करून विधी विभागाला परिपुर्ण व न्यायालयात टिकेल असा, असा से बनविण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अन्य सर्व विभागाच्या तुलनेत शून्य उपद्रवमुल्य असलेला विधी विभाग नव्याने चर्चेत आला आहे. शहर बसचा मुद्दा देखील उच्च न्यायालयात पोहोचला असून, त्यात महापालिकेने ‘से’ दाखल केल्यावर न्यायालयाने आठ दिवसात एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश बॅंक, मनपा व कंत्राटदाराला दिले आहेत.नागपूरनंतर अमरावती न्यायालयमहापालिकेने आरंभलेल्या झोननिहाय स्वच्छता कंत्राटाला नागपूर खंडपिठात आव्हान देण्यात आले. त्यात महापालिकेला से दाखल करावा लागला. उच्च न्यायालयाने ती याचिका खारिज करून लवादात जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कंत्राटदारांनी लवादात जाण्यापुर्वी फायनान्सियल बिड उघडण्यास स्थगिती द्यावी, या मागणीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तेथे देखील महापालिकेला नव्याने से दाखल करावा लागणार आहे. त्यावर ९ मे रोजी सुनावणी होणार आहे.मॅनपॉवरमध्ये पुन्हा कोर्टबाजीन्यायालयीन आदेशानुसार फायनान्सियल बिड रिव्हिजिट करत महापालिकेने कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट १९ एप्रिल रोजी स्थानिक गोविंदा संस्थेला दिले. मात्र, दुसऱ्यांदा दिलेल्या वर्कऑर्डरला देखील नागपूर खंडपिठात आव्हान देण्यात आले. त्यावर आयुक्त व संबंधित संस्थेला नोटीस बजावत ६ जूनपर्यंत बाजू मांडावयाची आहे. त्यात देखील विधी अधिकाऱ्याला आता ‘फ्रेश से’ दाखल करावा लागेल. मॅनपॉवरमध्ये नोव्हेंबर २०२२ पासून कोर्टबाजी सुरू झाली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती