याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी आरोपी सागर कैलास गायकवाड (२५, रा. गुरुदेवनगर, शिरजगाव कसबा) या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली. याबाबत मृताच्या मुलीने तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, मृताच्या मुलीचा झुनझुना (राजस्थान) येथे पहिला विवाह झाला होता. मात्र, एक वर्षापूर्वी ती तेथून परतली. त्यानंतर सागरशी तिचे प्रेमसंबंध जुळले. या संबंधाला वडील नंदा दहिकर यांचा विरोध होता, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून पुढे आली.
पोलीस सूत्रांनुसार, शिरजगावातील गुरुदेवनगरात राहणाऱ्या सागरने पाळा गाव गाठले. तेथे त्याची दहीकर यांच्याशी वादावादी झाली. त्यांचा या कथित प्रेमसंबंधाला विरोध होता. वाद वाढत जाऊन आरोपीने त्यांना काठीने बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोमवारी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह चांदूर बाजार ग्रामीम रुग्णालयात हलविण्यात आला. सोमवारीच अंत्यमसंस्कार पार पडले.
कोट
प्रेमप्रकरणाला विरोध करत असल्याने आरोपीने आपल्या पित्याला मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृताच्या मुलीने नोंदविली. त्यावरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
- पंकज दाभाडे, ठाणेदार, शिरजगाव कसबा