पोलिसां कडून संशयास्पद मृत्यूची नोंद
धारणी : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावील मांडवा गावातील सुशीला दशरथ नागले (४०) या महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांसमोर आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यांनतर चर्चेला उधाण आले. सध्या तिला शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणले असून, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत सुशीला नागले पती दशरथ नागले, त्यांचे मुलगे राजू नागले, राज नागले हे सर्व मांडवा गावात राहतात. त्यापैकी राजू नागले विवाहित असून, त्याचा परिवार शेजारीच राहतो. त्यांच्या कुटुंबात काही कारणावरून नेहमी वाद व्हायचा. त्या वादाच्या नादात शुक्रवारी दुपारी मृत सुशीला तिचे पती व मुलगा राज हे घरी झोपल्याचे पाहून गळफास लावून घेतल्याची माहिती नागरिकांनी धारणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तिच्या घरच्यांची प्राथमिक चौकशी केली असता, लहान मुलगा राज याने ‘माझ्या आईने साडीच्या पदराने गळ्याला गळफास लावला होता. तो गळफास मी सोडला. त्यांनतर तिला खाली टाकले‘, अशी माहिती दिली. तिचे पती दशरथ हे मोठ्या मुलाने भांडण केल्याचे तिने टेन्शन घेतले. त्यातच तिने गळफास लावल्याची माहिती दिली. यासह पती पत्नी दोघेही दारूच्या नशेत असल्याचे घटनास्थळी समजले. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण सनश्यास्पद असून, नेमका मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बॉक्स
मृत व पतीचा दारूविक्रीचा वयवसाय
मृत सुशीला व तिचे पती दशरथ हे दोघे कित्येक वर्षांपासून गावात दारूविक्रीचा व्यवसाय करीत होते. स्वतःही दारूच्या आहारी गेल्याने त्यांच्या कुटुंबात नेहमी वाद होत असल्याची माहिती गावकऱ्यांनी चौकशीदरम्यान दिली.