शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘मसल पावर’ वाढले, संचालकांना ‘व्हाईस’ नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:12 AM

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची असताना गत ११ वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज न देता दलालांमार्फत ही रक्कम ...

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची असताना गत ११ वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज न देता दलालांमार्फत ही रक्कम कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आली. बॅंकेत सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले असून, त्यांची ‘मसल पावर’ वाढल्याने संचालकांना ‘व्हाईस’ नाही, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी प्रवर्गातून बॅंकेत संचालकपदाचे उमेदवार संजय खोडके यांनी शुक्रवारी येथे केला.

४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनलचा जाहीरनामा जाहीर करताना ते बोलत होते. संजय खोडके यांच्या मते, बॅंकेची निवडणूक महत्त्वाची नाही, तर शेतकरी वाचला पाहिजे, तो जगला पाहजे, यासाठी ही लढाई आहे. पक्ष, विचार वेगवेगळे असताना जिल्ह्यातील विविध नेते शेतकऱ्यांची बॅंक वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले. बॅंकेचे अध्यक्ष उत्तरा जगताप, बबलू देशमख यांना ईडीची नोटीस आल्याच्या प्रश्नावर संजय खोडके यांनी ‘ईडीचा ऊहापोह नको’ असे म्हणत याविषयी बोलणे टाळले.

मात्र, बॅंकेत अपहार, भ्रष्टाचार झाला, हे कुणीही लपवू शकत नाही, याला दुजोरा दिला. आता बॅंकेत गैरव्यवहारांच्या चौकशीचे सत्र सुरू झाले असून, दोषींना त्यांचे कर्म एक दिवस दिसून पडेल, असे खोडके म्हणाले. बॅंकेच्या गैरव्यवहाराला संचालक नव्हे तर अध्यक्षच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालकांची सभा पाच मिनिटांत गुंडाळली जाते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल, असा सवालही खोडके यांनी उपस्थित केला.

यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, भाजपचे नेते, माजी आमदार अरुण अडसड, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर परिवर्तन पॅनलचे उमेदवार हजर होते.

-------------------