२४एएमपीएच०३ - सीटीसी केंद्रात दाखल करण्यात आलेल्या चिमुकलीसह तिची आजी
२४एएमपीएच०४ - रेहट्याखेड्या येथील दोन वर्षाच्या बालकाला केंद्रात दाखल करण्यात आले.
--------------------------------------------------------------------------------------------मेळघाटचा ध्येयवेड्या डॉक्टर कमी वजनाचे बालक शोधून नेतो सीटीसी केंद्रात, कुपोषण टाळण्याचा प्रयत्न
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : ‘तेरे हात-पैर जोडता माय, बच्चू को दवाखाना लेके चल. इस को अच्छा आहार और डॉक्टरों के नजर मे १५ दिन तक रख. वहा तुम्हारे खाने रहने की सब व्यवस्था करता. अपना बच्चा अपना को बचाना है. चल मेरी माय’, हे उद्गार कोण्या पालकाचे नव्हे, मेळघाटातील अवलिया एका ध्येयवेड्या डॉक्टरचे हे वाक्य आहेत. यात त्याची तळमळ दिसून येते. अतिदुर्गम आदिवासी पाड्यात घरोघरी जाऊन तो कमी वजनाची बालके शोधतो आणि न ऐकणाऱ्याचे हात पाय जोडून आरोग्य केंद्रातील सीटीसी केंद्रात उपचारासह पोषण आहारासाठी दाखल करीत आहे.
कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील हे दृश्य आरोग्य यंत्रणेच्या काही चुकांवर पडदा टाकणारे ठरले आहे. तालुक्याच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रेहट्याखेडा येथील डॉक्टर दीपक कुंडेटकर आणि वैद्यकीय अधिकारी सुषमा इंगोले, समुपदेशक शिवदास बिसंदरे, परिचारिका अर्चना नांदणे, एमपीडब्ल्यू बेठेकर, आशा सेविका धुर्वे, चालक विजय धुर्वे ही चमू लसीकरणानंतर पुन्हा कुपोषित कमी वजनाच्या बालकांच्या शोधमहिमेला लागली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि कुपोषित बालके दगावतात. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना गेल्या अनेक वर्षांपासून असल्या तरी मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण योग्य पोषणाअभावी आहेच. ते रोखण्यासाठी सुरू असलेली धडपड दखलयोग्य ठरली आहे. यापूर्वी कोरोना लसीकरणासाठी शेतीमध्ये पेरणी करून देणारे डॉक्टर राजेश कुंडेटकर आता या घटनेने पुन्हा चर्चेत आले आहे. सातव्या महिन्यात प्रसूती झालेल्या एका आदिवासी महिलेला आरोग्य केंद्रात नेण्यासाठी सासूच्या शिव्याशापसुद्धा ते ऐकून घेत आहेत.
बॉक्स
चल मेरी बहना, बच्चों को बचाना है,
सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या रायपूर येथील कविता प्रकाश धिकार (२२) या आदिवासी महिलेची १३ जुलै रोजी रात्री प्रसूती झाली. माहिती मिळताच १४ जुलैला सकाळी डॉक्टर व त्यांच्या चमूने प्रसूत महिलेचे घर गाठले. बाळाचे वजन केवळ १६०० ग्रॅम होते. घरीच प्रसूती झाल्याने डॉक्टरांनी दुसऱ्याचा दिवशी दवाखान्यात दाखल होण्याची विनवणी केली. मात्र, सासू शिव्याशाप देऊ लागली. डॉक्टरांनी हातपाय जोडून त्यांना विश्वासात घेतले आणि सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे सीटीसी केंद्रात पोषण आहार व उपचार सुरू आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सुषमा इंगोले, डॉ. दीपक कुंडेटकर लक्ष ठेवून आहेत.
बॉक्स
दोन वर्षांचा आकर्षण घेतो उपचार
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांसाठी आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या अंगणवाडी, ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, पुरवठा विभाग आदी सर्वांचे कार्य महत्त्वपूर्ण असताना आरोग्य आणि अंगणवाडी सेविका यांच्यावरच जबाबदारी लोटली जाते. रेहट्याखेडा येथील आकर्षण सुखदेव सेलूकर या दोन वर्षे वयाच्या बालकाचे वजन कमी असल्याने त्यालाही सेमाडोह येथे सीटीसी केंद्रात भरती करण्यात आले आहे
कोट
कमी वजनाच्या बालकांचा शोध घेऊन त्यांना आरोग्य केंद्रातील सीटीसी केंद्रात योग्य पोषण आहार व औषध उपचार करून वजन वाढविले जात आहे. कुपोषण व होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे आमची चमू काम करीत आहे.
- डॉ. दीपक कुंडेटकर, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेमाडोह (ता. चिखलदरा)