जिल्हा परिषद : पंचायत समिती,ग्रामपंचायतीत उपक्रम
अमरावती: पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने १ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती व अभियानात समाविष्ट १३ ग्रामपंचायती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हरित शपथ घेतली आहे.यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात १ते १५ जानेवारी दरम्यान ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरित शपथ घेण्यात आली. यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही शपथ स्थानिक स्वराज्य संस्थेचे मधील अधिकारी कर्मचारी व नागरिकांनाही देण्यात आली. या अभियानात झेडपीच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या शपथविधीनंतर अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय कामकाजात कागदाचा काटकसरीने उपयोग ऊर्जा बचत करणाऱ्या साधनांची खरेदी, एकदाच उपयोगात येणाऱ्या वस्तूंची खरेदी टाळणे, अन्नाचा दूर टाळणे, हरित भेटवस्तूंचा अंगीकार करण्याबाबत शपथ घेतली.