पत्रपरिषद : अभियांत्रिकी प्राचार्य फोरमचे आवाहनअमरावती : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर रोजगाराची संधी नाही, महागडे शिक्षण, स्पर्धा परीक्षांना वेळ मिळत नाही, सर्वसामान्यांना न झेपणारा हा अभ्याक्रम अशा अनेक प्रकारचे गैरसमज समाजात चुकीच्या पद्धतीन पसरविले जात आहे. मात्र अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी असून याबाबतचे गैरसमज दूर करावे, असे आवाहन प्राचार्य फोरमच्यावतीने शनिवारी येथे करण्यात आले आहे.येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पार पडलेल्या पत्रपरिषदेत अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्ध संधीचा पाढा वाचला गेला. २०२० सालापर्यंत २५ लाख अभियंत्याची देशाला गरज असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने कळविले आहे. ३७ लाख अभियंत्याना आयटी क्षेत्रात रोजगार मिळणार आहे. पाच कोटी क्षमता असलेले मनुष्यबळ येत्या काही वर्षात लागणार असल्याने या मनुष्यबळासाठी अभियंत्यांची गरज भासणार आहे. दीड लाख पात्र अभियांत्रिकी प्राध्यापकांची आवश्यकता असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या संधी नाहीत, हा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे, असे हव्याप्र महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत चेंडके यांनी सांगितले.सुरेश पाटील यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली. डी.टी इंगोले यांनी अमरावती व नागपूर परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यार्थ्याबाबत गैरसमज पसरविण्याचा डाव असल्याचा आरोप केला. ए.बी. मराठे यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून विद्यार्थी कमी झाल्याचे तोटे विशद केले. जी.आर. बमनोटे यांनी अभियांत्रिकी प्रवेशाबाबतची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. रोजगार नाही हे गैरसमज पसरविण्यामागे राजकारण असल्याचेही ते म्हणाले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे गैरसमज दूर व्हावे
By admin | Published: June 29, 2014 11:42 PM