अमरावती : जिल्ह्यात १,१६,३६६ क्विंटल हरभरा खरेदीचे वाढीच टार्गेट प्राप्त झाले व खरेदी केंद्रांचे नियंत्रणांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेली आहे. त्यानुसार ४५ केंद्रांवर सोमवार ८ मेपासून शासनमान्य दराने हरभऱ्याची खरेदी सुरु झाली. यासाठी महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची नोडल अधिकारी म्हणून संबंधित तहसीलदारांनी नियुक्ती केलेली आहे.
सहा नोडल एजन्सीजद्वारा वाढीव टार्गेटनुसार हरभऱ्याची खरेदी करावी. यासाठी ११ जून ही डेडलाईन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सर्व एजन्सीला पत्राद्वारे दिली. यामध्ये ८ ते १२ मे या कालावधीत एसएमएस पाठविलेले व खरेदी न झालेले शेतकऱ्यांना क्रमवारीनूसार बोलावून त्यांच्या चण्याची प्रथम खरेदी करण्यात येणार आहे.
सात-बारा क्षेत्राप्रमाणे चणा खरेदी करण्यात येणार आहे व यामध्ये प्रति शेतकरी कमाल मर्यादा २५ क्विंटल निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानंतर १५ मेपासून पुढील १५ दिवसांकरिता नव्याने एसएमएस देण्याचे निर्देश आरडीसींनी सर्व नोडल एजन्सीला दिले आहेत.