अमरावती : आगामी डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना तसा आदेश दिला. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपंचायतीसह नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठीच्या हालचाली वाढणार आहेत.
जिल्ह्यातील धारणी, भातकुली, तिवसा आणि नांदगाव खंडेश्र्वर या चार नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. मात्र, कोरोना संकटामुळे नगरपंचायतींचा कार्यक्रम अद्यापही घोषित झालेला नाही. तर १० पैकी ९ नगरपरिषदेचा कार्यकाळ येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान संपणार आहे.यामध्ये अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,अचलपूर,चांदूर बाजार,मोर्शी,वरूड,चांदूर रेल्वे,धामणगांव रेल्वे,शेंदूजना घाट या ९ नगरपरिषदेचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होण्याची शक्यता आहे.मात्र त्यासाठी २०२२ उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून दोनऐवजी एकच नगरसेवक निवडला जाणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यात हालचाली वाढल्या
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम अद्याप घोषित झालेला नाही.मात्र या निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छूकांनी राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.