शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

नगररचना विभागाचा नकार तरीही अडीच कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 10:59 PM

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरी वस्तींचा विकास करताना त्याच वस्तींमधील विकास कामे करणे अनिवार्य आहे. मात्र, अचलपूर नगर परिषदेने नगररचना विभागाच्या नकारानंतरही बाहेरील नागरीवस्तींमध्ये अडीच कोटींची कामे करून शासननिर्णयाला धक्का दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता कशी मिळते, हादेखील संशोधनाचा विषय आहे.

ठळक मुद्देअचलपूर नगर परिषदेचा प्रताप : ‘एससी’ नागरीवस्ती डावलून बांधकामांना प्रशासकीय मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरी वस्तींचा विकास करताना त्याच वस्तींमधील विकास कामे करणे अनिवार्य आहे. मात्र, अचलपूर नगर परिषदेने नगररचना विभागाच्या नकारानंतरही बाहेरील नागरीवस्तींमध्ये अडीच कोटींची कामे करून शासननिर्णयाला धक्का दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता कशी मिळते, हादेखील संशोधनाचा विषय आहे.अचलपूर नगर परिषदेने सन २०१२-१३ मध्ये नगरचना कार्यालयाकडे नागरी वस्तीमध्ये विकासकामांची यादी मान्यतेसाठी पाठविली होती. त्याअनुषंगाने नगररचना विभागाच्या चमूने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता, नगर परिषदेने सूचविलेली ९० टक्के विकासकामे ही चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जाती वस्तीबाहेरील प्रस्तावित केल्याचे सहायक संचालक नगररचना यांनी २७ फेब्रुवारी २०१३ रोजी पत्र पाठवून मुख्याधिकाºयांना कळविले होते. त्यामुळे ही विकासकामे नामंजूर करण्यात येत असल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले. मात्र, ही नामंजूर कामे नगर परिषदेने केल्याचे दर्शवून अनुदानित निधीचा गैरवापर करण्यात आल्याबाबत २०१३-१४ च्या लेखापरीक्षणात आक्षेपदेखील नोंदविण्यात आले आहेत. ‘एससी’ वस्त्यांंचा निधी अन्य ठिकाणी विकासकामे करण्यात आली असे भासवून नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकाºयांनी गेल्या १५ ते २० वर्षांत मलई ओरबाडली आहे. चार वर्षांत ‘एससी’ वस्तीबाहेरील नसलेली कामे नमूद लेखाआक्षेपांचे अचलपूर नगर परिषदेने अनुपालन केले नाही. १०० टक्के अनुदानाचा गैरवापर होत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात अचलपूरचे विद्यमान मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाही, हे विशेष.राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारलोकड आॅडिट फंडने ‘एससी’ वस्त्यांमध्ये विकासकामे नियमबाह्य केल्याचे लेखाआक्षेप नोंदविले आहे. सन २०१३-१४ च्या लेखापरीक्षणात ही बाब स्पष्टपणे नमूद असताना, अचलपूर नगर परिषदेने सुधारणा केली नाही. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या नागरी वस्ती विकासासाठी येणाºया निधीची लूट होत असल्याप्रकरणी अचलपूर येथील किशोर मोहोड यांनी ही गंभीर बाब राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारीद्वारे पोहचविली आहे.लेखापरीक्षणात ‘एससी’ नागरी वस्ती व्यतिरिक्त विकासकामेपत्थर रोड ते देवी ते चांभारवाडी काँक्रीट रोड - ५ लाख ५१ हजार १६९ रुपयेराजू कुरई ते दत्त मंदिर काँक्रीट नाली- २ लाख ६१ हजार ७८८ रुपयेगैरवाडी ते अमिनाथ मंदिर रस्ता डांबरीकरण- ४ लाख ९३ हजार २३१ रुपयेकाली कबर ते अर्डक वेल्डिंग पुनर्डांबरीकरण- २ लाख ६० हजार २५१ रुपयेमेन रोड ते बरडे डांबरीकरण - ३ लाख २३ हजार ८१६ रुपयेसंजय तायडे ते मुने किराणा काँक्रीटीकरण - २ लाख ३३ हजार ९५० रुपये