राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दीअमरावती : येथील व्हीएमव्ही परिसर व मराठा फे्रन्ड्स क्लबच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस पुरुष गटातील नागपूूर, अमरावती, दर्यापूर संघाने गाजविला. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी परिसरातील मैदानावर महिला व पुरुष गटातील कबड्डी सामने पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली आहे. ओम अमर नागपूर १२ गुण व मोहनापुुरी कळंबा १० गुण या रंगतदार झालेल्या सामन्यात दोन गुणांची आघाडी घेऊन नागपूर संघ विजयी झाला. आझाद क्रीडा मंडळ अमरावती ३७ गुण व जगदंबा क्रीडा मंडळ अकोला यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात एका गुणाने अकोला संघ विजेता ठरला. नवरंग युवा अमरावती १० गुण या संघावर एकेरी मात करून ग्रामीण क्रीडा मंडळ हातुर्णा संघाने २० गुण घेऊन विजयश्री खेचली. लोकमान्य क्रीडा मंडळ कारंजा १५ गुण या संघाला माँ चंडिकाश्वरी मंडळ, मोहाडी गोंदिया संघाने २१ गुण घेत धूळ चालरी. गाडगेबाबा क्रीडा मंडळ ३१ गुण घेऊन विजयी झाला. प्रतिस्पर्धी संघ हनुमान क्रीडा मंडळ केळीवेळी या संघाला १५ गुणांवर समाधान मानावे लागले. युवक क्रीडा मंडळ अमरावती १३ व वैष्णवी स्पोर्टिंग क्लब दर्यापूर संघ २६ गुणांवर विजयी झाला. छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती १४ व हनुमान मंडळ खामगाव संघाला ३१ गुण घेऊन खामगावने एकतर्फी बाजी मारली. लक्ष्मीकांत मंडळ अमरावती ८ व शिवाजी क्रीडा मंडळ कोपरा ३४ गुण मिळवून विजयी झाला. गाडगेबाबा मंडळ मूर्तीजापूर २९ व मैनापूर काजळंबा २० मध्ये रंगलेल्या सामन्यात मूर्तीजापूरने विजयश्री खेचला. नवरंग युवा अमरावती व जय जिजाऊ संघ तोंडगावमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात ३६ गुण घेत तोंडगाव संघ विजयी झाला. जयहिंद यवतमाळने अंबिका खामगाववर मात केली. विदर्भ क्रीडा तिवसा या संघाला रामनगर वर्धा संघासमोर नांग्या टाकाव्या लागल्या. यावेळी महिला गटातील सामनेही तेवढेच चुरशीचे झालेत. युवा क्रांती सातेगाव १९ गुण या संघावर मराठा लायनर्स काटोल संघाने ४१ गुण घेऊन वर्चस्व कायम ठेवले. जागृती आर्वी संघावर एकतर्फी मात करीत एफईएस चंद्रपूर संघाने ४० गुण घेऊन आघाडी घेत, तर बाजीप्रभू आकोला संघाला प्रशिक्षण केंद्राला याने चित केले. समर्थ क्रीडा मंडळ अमरावती यासंघावर मात करीत जगदंबा संघाने विजय प्राप्त केला. (प्रतिनिधी)
नागपूर-अमरावती दर्यापूर संघाने गाजविला दुसरा दिवस
By admin | Published: January 10, 2016 12:26 AM