लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शारदानगरातून बेपत्ता झालेली कोमल काकाणी ही १३ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी नागपुरात सापडली. सोशल मीडिया व पोलिसांच्या सजगतेने कोमलचा शोध लागला. तिला राजापेठ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अमरावतीत आणले.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी कोमल काकाणी रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी शोधकार्य सुरू केले. कोमल बेपत्ता झाल्याची माहिती अनेकांच्या व्हॉट्सअॅप समूहावर झळकली. कोमलच्या आई-वडिलांनी राजापेठ पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोधमोहीम राबविली. बसस्थानके, रेल्वेस्थानके आदी ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम राबविली. मात्र, रात्रीपर्यंत तिचा सुगावा लागला नव्हता. कोमलचे छायाचित्रासह माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अमरावती शहरासह राज्यभरात कोमलच्या अपहरणाची चर्चा रंगली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनीही तपासाची सूत्रे हलवून राजापेठ पोलिसांना योग्य निर्देश दिलेत. पोलिसांनी कोमलच्या छायाचित्रांची फलके विविध शहरांत लावली. शनिवारी सकाळी कोमल ही नागपुरात असल्याचे कळताच पोलिसांना व तिच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला. राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अनिल मुळे व गोकुल ठाकूर, नरेंद्र ढोबळे, दीपक श्रीवास व महिला पोलीस सारिका यांनी शनिवारी सकाळीच नागपूर गाठून कोमलला ताब्यात घेतले.अशी गवसली कोमलकोमल रागाच्या भरात १९ सप्टेंबरला सायंकाळी घरातून निघून गेली. तिने अमरावती बसस्थानकावरून रात्री ९.४५ वाजताच्या शेगांव-नागपूर बसने नागपूर गाठले. दरम्यान बसमधील पूजा काशीकर व मीना पोरटे या दोघींनी तिला विचारपूस केली. मध्यरात्री एसटी नागपूर बसस्थानकावर पोहोचल्यानंतर कोमल एकटीच असल्याचे पाहून मीना पोरटे यांनी तिला एसटी विभागाचे नियंत्रक वंजारी यांच्या स्वाधीन केले. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने वंजारींनी कोमलला पोरटेच्या स्वाधीन केले. दुसºयाच दिवशी मीना यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याचे निधन झाले. त्यावेळी कोमल ही मीना यांच्यासोबतच होती. शनिवारी सकाळी नियंत्रक वंजारी यांच्या मोबाईलवर कोमल बेपत्ता झाल्याची माहिती व छायाचित्र झळकले. त्यानंतर कोमलचा परतीचा प्रवास सुरू झाला.
कोमल सापडली नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:09 PM
शारदानगरातून बेपत्ता झालेली कोमल काकाणी ही १३ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी नागपुरात सापडली. सोशल मीडिया व पोलिसांच्या सजगतेने कोमलचा शोध लागला.
ठळक मुद्देचर्चेला पूर्णविराम : पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी