लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : नागपूर येथून मित्रांसह पर्यटनासाठी आलेल्या इसमाचा चिखलदरा येथील जत्राडोह धबधब्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली. अंघोळीनंतर छायाचित्र काढण्याच्या नादात धबधबा कोसळत असलेल्या उंचावरील पहाडावर चढल्याने त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो थेट डोहात बुडून मृत्यू पावला. अनिल रंगराव राऊत (४७, तुकाराम नगर, कळमना रोड, जुना कामठी रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे.अभिषेक सुरेश चट्टी (३२, कामठी), सागर संतोष तिटकारे (२४, रा. पंधराखेडी, ता. सावनेर), अजय बाबूलाल गजरे (२२. रा पंधराखेडी), अशोक दौलतराव ठाकरे (५७. रा. लोणखारी ता. कामठी), अभिलाष चिंतामण मेघरास (२६, रा. नांदा, छिंदवाडा रोड, कामठी), गुणवंत गोविंद राऊत (३६, रा. गुजनी कोरडी) या मित्रांसह अनिल राऊत हे चिखलदरा पर्यटनस्थळावर आले. मंगळवारी दुपारी १२.३० वाजता यातील काही मित्रांनी जत्राडोह येथे धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ केली. त्यानंतर अनिल राऊत हे धबधब्याचा कोसळत असलेल्या उंच पहाडावर चढले. तेथून छायाचित्र घेण्याच्या नादात पाय घसरून थेट डोहात कोसळल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. चिखलदरा पोलिसांनी आदिवासींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास ठाणेदार आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनायक लंबे, राजू पुरोहित करीत आहेत.अपघाती मृत्युसंख्येत वाढसातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणात घाटवळणे आहेत. ठिकठिकाणी उंच पहाड, त्यातून कोसळणारे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. मात्र, येथे अकारण उत्साह दाखविणारे पर्यटक नाहक स्वत:चा जीव गमावतात. अशा मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. धोकायदायक स्थळावर सेल्फी, छायाचित्रणाचा नाद जीवघेणा ठरला आहे.
नागपूरच्या पर्यटकाचा जत्रा डोहात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 6:00 AM
मंगळवारी दुपारी १२.३० वाजता यातील काही मित्रांनी जत्राडोह येथे धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ केली. त्यानंतर अनिल राऊत हे धबधब्याचा कोसळत असलेल्या उंच पहाडावर चढले. तेथून छायाचित्र घेण्याच्या नादात पाय घसरून थेट डोहात कोसळल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देमित्रासह आला होता पर्यटनाला : फोटोच्या नादात जीव गेला