अनेक शासकीय कार्यालयांत लँडलाइनचा वापर नावालाच
अमरावती : राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाइल वापरावर निर्बंध घातले आहेत; परंतु जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कार्यालयांतील लँडलाइनचा वापर कमी होत असल्याचे निदर्शनास आले. बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांनाच सरकारी कामासाठी स्वतःचा मोबाइल वापरावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.
सरकारी कार्यालयामध्ये मोबाइल वापरण्यासंदर्भात काही नियम आहेत. कामावर असताना मोबाइलवर बोलण्यास किंवा चॅटिंग करण्यास मनाई आहे. बहुतांश सरकारी कार्यालयांमध्ये या नियमांची अंमलबजावणी होतेच असे नाही. अनेक कार्यालयांत कर्मचारी फोनवर वीस वीस मिनिटे, अर्धा अर्धा तास बोलत असल्याचे आढळून येतात. जिल्हा परिषद, महसूल किंवा अन्य कार्यालयांमध्ये कर्मचारी फोनवर बाेलत काम करतात. तर बोलता बोलताही काम करतात.
बॉक्स
अशी आहे आचारसंहिता
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाइलचा वापर करावा.
मोबाइलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये, कार्यालयीन कामासाठी मोबाइलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाइलवर आलेल्या अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.
बॉक्स
जिल्हाधिकारी कार्यालय
विभागप्रमुख जेव्हा कार्यालयात हजर असतात तेव्हा फोनवर बोलण्याचे किंवा चॅटिंग करण्याचे प्रमाण खूप कमी असते. विभागप्रमुख जेव्हा कार्यालयातून निघून जातात किंवा दौऱ्यावर असतात त्यावेळी कर्मचारी त्याच्या जागेवर हजर असले तरी मोबाइलवर फोन आल्यास किंवा कामानिमित संवाद साधताना दिसतात.
बॉक्स जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता अनेक विभागात कर्मचारी मोबाइलवर बोलताना बराच वेळ दिसून आले. काही कर्मचारी मोबाइलवर बोलत बाहेर फिरत होते. बरेच कर्मचारी मोबाइलवर सोशल मीडियावर माहिती चाळताना आढळले. तर यातील काही जण चॅटिंग करीत होते. कर्मचाऱ्यांच्या मोबाइल संभाषणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बॉक्स
काम नावाला, मोबाइल कायम कानाला
जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी चहा पिण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर बराच वेळ फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले.
परंतु हे प्रमाण खूपच कमी असून बहुतेक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी मोबाइल फोनचा अधिक वापर करावा लागतो.
बॉक्स
सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या आहेत
शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या अधीनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन वापरासंदर्भात सूचना दिल्या. शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट केले आहे.
-पवनीत कौर,
जिल्हाधिकारी
बॉक्स
वैयक्तिक मोबाइल फोनचा वापर कमी
कोट
शासनाच्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाइल वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधांसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत सूचना विभागप्रमुखांना दिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेत शासनाच्या मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी केली जाईल.
अविश्यांत पंडा,
मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद
बॉक्स
सरकारी कार्यालय नको रे बाबा !
जिल्हा परिषदेमधील कर्मचारी जागेवर नसतात. कामांनिमित्त गेल्यावर मोबाइलवर बोलत असल्यास थांबावे लागते. साहेब आमचे काम करा, असे विचारल्यावर कर्मचारी काम होईल, असे सांगून वेळ निभावून नेतात. त्यामुळे कामे वेळेवर होणे गरजेचे आहे.
-रामकृष्ण सहारे,
नागरिक
काेट
गावखेड्यातून पैसे खर्च करून शहराच्या ठिकाणी कामासाठी जावे लागते. यात पैसा अन् वेळही जातो. मात्र, बरेच वेळा काम होईल या अपेक्षेने जात असताना संबंधित बाबू सुटीवर असल्याचे सांगितले जाते किंवा बाहेर गेले आहेत. यातही ते केव्हा येणार, याचाही ठावठिकाणा राहत नाही.
-विलास रेहपांडे,
नागरिक