सिनेट सदस्य मनीष गवई यांची मागणी, व्यवस्थापन परिषदेने निर्णय तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यपालांना पत्र लिहणार
अमरावती : उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यात मोठ्या थाटात साजरी केली जाणार आहे. अण्णाभाऊंनी केलेले विविधांगी कार्य चकित करणारे आहे. हे वर्ष अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लोककला विभागाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात गवई यानी अधिसभेमध्ये मागणी केली होती. मात्र, व्यवस्थापन परिषदेने हा धोरणात्मक निर्णय असल्याच्या कारणाने ही मागणी नाकारली. परंतु, याबाबत व्यवस्थापन परिषदेने पुन्हा आपल्या निर्णयावर विचार करावा आणि १ ऑगस्टपर्यंत अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या लोककला विभागाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात घोषणा करावी, अन्यथा राज्यपालांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे पत्र लिहिणार असल्याची मागणी राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी प्रत्यक्ष भेटून कुलगुरूंना निवेदनातून केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा यांनीदेखील मागणीचे समर्थन करणारे पत्र विद्यापीठाला दिले आहे.
-------------------