शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

रक्तदाता संघाने उंचावले वरूडनगरीचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 9:58 PM

१ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत अवघ्या दोन वर्षांच्या काळात एक कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे रक्त संकलित करून त्याचा गरजूंना मोफत पुरवठा करणारा ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाने वरूडनगरीचे नाव उंचावले आहे. राज्यात मोफत रक्तपुरवठा करणारा हा एकमेव रक्तदाता संघ होय.

ठळक मुद्देरक्तक्षयग्रस्तांना घेतले दत्तक : तीन वर्षांत कोट्यवधींना मोफत रक्तपुरवठा

संजय खासबागे।आॅनलाईन लोकमतवरूड : १ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत अवघ्या दोन वर्षांच्या काळात एक कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे रक्त संकलित करून त्याचा गरजूंना मोफत पुरवठा करणारा ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाने वरूडनगरीचे नाव उंचावले आहे. राज्यात मोफत रक्तपुरवठा करणारा हा एकमेव रक्तदाता संघ होय.वरूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत रक्त चणचणीबाबत चर्चा केली आणि २०१५ मध्ये ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाची स्थापना झाली. या संघाने तीन वर्षांमध्ये १६ हजारांवर रक्तपिशव्यांचे संकलन केले. रक्तदाता संघाने रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी, नागपूरची डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जीवनज्योती रक्तपेढी आणि वरूड ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला. दोन्ही रक्तपेढी अंतर्गत शासन निर्णयानुसार व शासनाच्या अटी-नियमांना अधीन राहून मोफत रक्तपुरवठा केला जातो. रक्तदान चळवळ अविरत सुरू ठेवण्याकरिता रक्तदाता संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटिये, उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, दिलीप भोंडे, सचिव चरण सोनारे, शैलेश धोटे, कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार, संघटक सुधाकर राऊत, सदस्य संजय खासबागे, पंकज केचे, योगेश ठाकरे, आशिष वानखडे, मनोहर थेटे, यशपाल जैन, सचिन परिहार, अतुल काळे, प्रवीण खासबागे, राहुल बरडे, सुनील उईके परिश्रम घेत आहेत. रक्तदाता संघाच्या कार्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, सेवाभावी संस्थांनी घेत वेळावेळी सत्कार केला.मोफत रक्तपुरवठाजिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये शासकीय रक्तपेढीमार्फत रक्त पुरविण्यात येऊन रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. नागपूरच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणाºया गरजू रुग्णांकरिता मोफत रक्तपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जीवनज्योती रक्तपेढी यांच्यासोबत लेखी क रार करून मोफत रक्ताची सुविधा केली आहे. मोफत रक्तपुरवठा करणारा रक्तदाता संघ हे राज्यातच नव्हे, तर देशात एकमेव ठरले आहे, हे विशेष.रक्तदान चळवळीचा ध्यास..: मोर्शी येथील जयदेवा मंडळाच्यावतीने वरुड येथे रक्तदान चळवळीला उभारी देण्याचा प्रयत्न झाला. याची प्रेरणा घेऊन १० वर्षांपूर्वी प्रवीण चौधरी यांनी महारक्तदान शिबिर घेतले. या चळवळीला व्यापक स्वरूप प्रमोद पोतदार यांच्या संकल्पनेतील रक्तदाता संघाने आणले. महिन्याला किमान ४०० रक्त पिशव्यांचे लक्ष्य संघाचे असते. वेळीच रक्त उपलब्ध होत असल्याने सिकलसेल, अ‍ॅनेमिया आणि थॅलसेमियाच्या ६६ रुग्णांना रक्तदाता संघाने दत्तक घेतले आहे.