अमरावती : मतदार यादीत नावे समाविष्ट असताना ९१,१८७ नागरिकांचे छायाचित्र यादीत नाहीत. मतदार यादीचे अपडेशन सुरू असल्यामुळे संबंधित नागरिकांनी छायाचित्र बीएलओ किंवा तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडे जमा न केल्यास सदर मतदारांची नावे यादीतून वगळण्याची शक्यता आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या गृहभेटीत ८८ हजार मतदार नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनात आले. छायाचित्रासह मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाद्वारा होत आहे. राष्ट्रीय कार्य असल्याने संबंधित मतदारांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मतदारयादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील अशा मतदारांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशा मतदारंची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून पडताळनीही होत आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी मंगळवारपर्यंत आपली छायाचित्र जमा करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी केले आहे.
बॉक्स
छायाचित्र जमा करण्यासाठी ८ जुलै ‘डेडलाईन’
मतदार यादीसाठी छायाचित्र जमा करण्यासाठी २८ जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ही डेडलाईन आता ८ जुलैपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यानंतर मात्र, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० व मतदार नोंदणी अधिनियमाच्या नियम १९६० मधील तरतुदीनुसार व भारत निवडणूक आयोगाच्च्या गाईडलाईननुसार नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
येथे जमा करा छायाचित्र
मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदान नोंदणी अधिकारी किंवा संबंधित तहसीलदार यांचे कार्यालयात छायाचित्र जमा करावे लागणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या नागरिकांची पडताळणी करीत आहेत.
पाईंटर
जिल्ह्यातील एकूण मतदार : २४,६१,८८७
छायाचित्र नसलेले मतदार : ९१,१८७
बीएलओद्वारा व्हेरिफिकेशन : ५९,२७१
आतापर्यंत फोटो जमा : ३,०६५
कोट
छायाचिछासह मतदार यादी अद्यावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादीची बीएलओद्वारा भौगोलिक पडताळणी करण्यात येत आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत त्यांनी त्वरित फोटो बीएलओ, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावे, अन्यथा त्यांची नावे यादीमधून वगळण्यात येतील.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी