शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

सांडपाण्यावर साकारला नाना-नानी पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:37 AM

राज्यात यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमापूर्वीच अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा येथील पर्यावरणप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी गावातील सांडपाण्याचा विनियोग करीत नाना-नानी पार्क आणि रस्त्याने वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेम : सावळी दातुरा येथे वृक्षलागवडीसाठी केला वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राज्यात यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमापूर्वीच अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा येथील पर्यावरणप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी गावातील सांडपाण्याचा विनियोग करीत नाना-नानी पार्क आणि रस्त्याने वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.दिवसेंदिवस पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. दुसरीकडे वृक्षतोड होत आहे. यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळेच परतवाडानजीक सावळी दातुरा येथील आदिवासी पर्यावरण संघटनेने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. प्यारेलाल प्रजापती यांनी चक्क सांडपाण्याचा वापर करून सावळी ते धामनगाव गढी या तीन किमी रस्त्यावर वृक्षारोपण वे संगोपन करून झाडे वाढविली. यासाठी गावातील सांडपाणी एका ठिकाणी अडवून, ते मोटारीने झाडांपर्यंत नेले. या झाडांमध्ये पिंपळ, उंबर, कडुनिंब, करंज, आवळा, सीताफळ, जांभूळ कन्हेर, जास्वंद, तगर आदी वृक्ष, फळझाडे, फुलेझाडे आहेत. हजारो झाडे जगत असताना शासनाकडून त्यांनी छदामही मिळविला नाही. आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खानझोडे, प्यारेलाल प्रजापती, नरेंद्र भाकरे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, ममता डहाके, अक्षय उमप, पवन जरिये, संजय उगले, प्रदीप चांंदूरकर यांनी सदर रस्ता व जुळ्या शहरातील नागरिकांच्या सहकार्याने केलेला संकल्प कौतुकास्पद ठरला आहे.पार्क तयार करून दिला पर्यावरण संदेशआजूबाजूची वृद्ध मंडळी व चिमुकल्या बालकांसाठी सकाळ-सायंकाळी विरंगुळ्यासाठी आवश्यक असे उद्यान नसल्याचे पाहता, सावळी दातुरा येथील शासकीय जागेवर नाना-नानी पार्कची संकल्पना पुढे आली. आदिवासी पर्यावरण संघटनेने विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली. त्यांचे दोन वर्षांचे श्रम वाया गेले नसून, ग्रामस्थांसाठी सुंदर उद्यान येथे साकार झाले आहे.सांडपाण्याचा योग्य विनियोग करून २ वर्षांपासून वृक्षलागवड व संगोपन केले जात आहे. आज टुमदार उद्यान आणि रस्त्याच्या कडेला झाडं मोठी होत आहेत. पर्यावरणासाठी संघटनेसोबत घेतलेला वसा कुणीही टाकणार नाही.- प्यारेलाल प्रजापती, आदिवासी पर्यावरण संघटना, परतवाडा