शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

वातावरणीय बदलास राज्यात नंदूरबार सर्वाधिक संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:09 AM

वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे.

ठळक मुद्दे‘टेरी’चा अहवाल सन २०३० ते २०७० या कालावधीतील वातावरण बदलाचे शास्त्रीय अनुमान

गजानन मोहोड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे. यामध्ये सन १९७० ते २००० या कालखंडातील सरासरी हवामान व तापमानाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सन २०३० ते २०७० या कालखंडातील वातावरणीय बदलांचे शास्त्रोक्त अनुमान काढले आहे. यामध्ये वातावरणीय बदलास सर्वाधिक अतिसंवेदनशील निर्देशांकांत (व्हर्नेबिलिटी इंडेक्स) नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे. असुरक्षिततेमध्ये जळगाव, संवेदनशीलमध्ये औरंगाबाद, तर अनुकूलनमध्ये सिंधुदूर्ग जिल्हा प्रथमस्थानी आहे.जागतिक स्तरावरील वातावरणीय बदलाचे अनुमान महाराष्ट्र राज्यात जसेच्या तसे लागू होत नसल्याने राज्याची भौगोलिक स्थिती व स्थान लक्षात घेता शास्त्रोक्त अनुमान काढण्यात आले. यासाठी यु.के.मेट, टेरी यासंस्थांद्वारा रिजन क्लॉयमेट मॉडेलिंग सिस्टम व एचएडीआरएम३पी या दोन मॉडेलची निवड करून अनुमान काढण्याचे काम केले आहे. या अनुमानाची पडताळणी करण्यासाठी करण्यासाठी सन १०७० ते २००० या कालावधीतील राज्य शासनाच्या विविध विभागाकडची सांखिकी माहिती उपलब्ध करून देण्यात येऊन प्रक्षेपित अंदाजांची पडताळणी करण्यात आली व या अहवालानुसार राज्यातील विभागनिहाय तापमान व पर्जन्यमानातील होणाºया संभाव्य बदलाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्यात कमालपेक्षा किमान तापमानाचे सरासरी तापमान वाढणार आहे व यामुळेच पर्जन्यमान व उष्णता निर्देशांकात बदल होणार असल्याचे अनुमान नोंदविण्यात आलले आहे. या बदलास सामोरे जाताना महत्त्वाच्या १४ शिफारसी राज्याचे वातावरणीय बदल अनुकूलन धोरणात करण्यात आलेल्या आहेत.फळपिकांवर कीड व रोग वाढणारसन २०३०, २०५० व २०७० या कालखंडात वाढते तापमान व आर्द्रतेमधील बदलामुळे डाळींब, द्राक्षे, केळी, आंबा व संत्रा या पिकांवर रोगराई वाढणार आहे. पिकांची तग धरण्याची क्षमता कमी होणार आहे. अनियमित पाऊस यासाठी पोषक राहणार असल्यामुळे सरासरी उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होणार आहे. रोगराईस पोषक वातावरणामुळे मलेरिया, डेंग्यू आजाराची क्षेत्रव्याप्ती वाढणार आहे. संभावित अतिवृष्टीमुळे लोकवस्तीवर विपरित परिणाम होईल. वाढणाºया उष्णतामानामुळे उर्जेची मागणी वाढणार आहे.वातावरणीय बदलास अतिसंवेदनशील प्रथम दहा जिल्हेअतिसंवेदनशील निर्देशांक- नंदूरबार, धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम गडचिरोली.संवेदनशील : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, ठाणे, नांदेड, अकोला, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळअसुरक्षित : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, अकोला, नंदूरबार, नाशिक, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळअनुकूलन : सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, वर्धा, रायगड, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, भंडारा

टॅग्स :environmentवातावरण