निवडणुकीला गालबोट : दगडफेक, दोनदा लाठीमार, दोन शिपाई जखमी, ठाणेदालाही धक्काबुक्की, ८६ जणांविरुद्ध गुन्हेसुमित हरकूट चांदूरबाजारस्थानिक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाकरिता गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय समर्थनाने मनीषा नांगलियांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामध्ये प्रहारच्या सुनीता विजय गणवीर यांना धक्कादायक पराभव पत्कारावा लागला. नगरपरिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांच्या समक्ष हात उंचावून निवडणूक घेण्यात आली. यामध्ये मनीषा नांगलिया यांना प्रहारची दोन, राकाँ तीन, भाजप एक, काँॅग्रेस एक तर अपक्षाचे एक अशी एकूण नऊ मते मिळालीत. सुनीता गणवीर यांना प्रहारचे सात व राकाँचे एक अशी एकूण आठ मते मिळालीत. ही निवडणूक अत्यंत चुुरशीची झाली. प्रहारची एकहाती सत्ता असलेली नगरपालिका सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन काबीज केल्याने ही प्रहारला मोठी चपराक मानली जात आहे. नगरपालिकेत तणावपूर्ण वातावरणात पहिल्यांदाच अशी निवडणूक पार पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.आश्वासनपूर्ती न झाल्याने ‘प्रहार’मध्ये बंडखोरीआ. बच्चू कडू यांनी मनीषा नांगलिया यांना नगराध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी अन्य उमेदवाराचे नाव जाहीर केले. परिणामी नगरसेविका मनीषा नांगलिया, मनोज लंगोटे, गोपाल तिरमारे या नगरसेवकांनी बंडखोरी करून आ. कडू यांना घरचा अहेर दिला. आमदारांनी ऐनवेळी शब्द फिरविल्यामुळे प्रहारमध्ये ही आव्हानात्मक बंडखोरी झाली नि बच्चू कडू यांनी हातची सत्ता गमावली.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रहार कार्यकर्त्यांतर्फे दगडफेक करण्यात आली. जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. - सतीशसिंंह राजपूत, ठाणेदार, चांदूरबाजार
नांगलिया नगराध्यक्ष, प्रहारने गमावली सत्ता!
By admin | Published: October 30, 2015 12:18 AM