श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : गेल्या महानगरपालिका निवडणुकांआधी घाईगडबडीत अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल राजकारण्यांनी सुरू केले. त्यानंतर तब्बल दीड वर्षे होऊनही हा उड्डाणपूल अंधारातच आहे. दोन महिन्यांपासून यावर लाईट्स बसविण्यात आले. मात्र, सुरू का होत नाही, हा प्रश्न वाहतूकदारांना सतावत आहे. ज्या तत्परतेने उड्डाणपूल सुरू केला त्याच तत्परतेने लाईटस् सुरू करावेत असे बोलल्या जात आहे.अमरावती ते बडनेरा मार्गावर मोठी वर्दळ आहे. दीड वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. दरम्यान महापालिकेची निवडणूक असल्याने राजकारण्यांनी श्रेय लाटण्याच्या लढाईत प्रकाश व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले. १३ महिन्यांनंतर नरखेड रेल्वे क्रॉसिंगवर लाईट्स बसविण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यांपासून हे पथदिवे सुरू झालेले नाही. आधीच हा उड्डाणपूल रुंदीने कमी आहे. त्यात रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना येथून जात असताना जीव मुठीत ठेवूनच चालावे लागत आहे. बरेच अपघातदेखील घडत आहेत. ते पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी वाहनधारकांची मागणी आहे.अर्धा किलोमीटरचा डेंजर रस्ताअमरावती ते बडनेरा मार्गावरील साहिल लॉनसमोरून जाणारा अर्धा किलोमीटर अंतराचा खराब रस्ता वाहतुकदारांना प्रचंड धोक्याचा ठरत आहे. सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला. मात्र, याचा अर्धा भाग तसाच सोडल्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडत आहे. रात्री याठिकाणी पुरेसा प्रकाश नसतो. बारीक गिट्टी एका बाजूने आहे. श्वान रस्त्याहून आडवे पळतात. पुढे पावसाळा असल्याने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा, असे बोलले जात आहे.
नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल दीड वर्षांपासून अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:48 PM
गेल्या महानगरपालिका निवडणुकांआधी घाईगडबडीत अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल राजकारण्यांनी सुरू केले. त्यानंतर तब्बल दीड वर्षे होऊनही हा उड्डाणपूल अंधारातच आहे. दोन महिन्यांपासून यावर लाईट्स बसविण्यात आले. मात्र, सुरू का होत नाही, हा प्रश्न वाहतूकदारांना सतावत आहे. ज्या तत्परतेने उड्डाणपूल सुरू केला त्याच तत्परतेने लाईटस् सुरू करावेत असे बोलल्या जात आहे.
ठळक मुद्देअपघातात वाढ : पथदिवे बसविले, सुरू केव्हा करणार? नागरिकांचा सवाल