शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

‘नासा’ तात्काळ देणार जंगलातील आगीचा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:36 PM

जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास आता ही माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांची नोंदणी सुरूवनरक्षक ते मुख्य वनसंरक्षकांचे कार्यक्षेत्र उपग्रह प्रणालीवर

लोकमत न्यूज नेटवर्कगणेश वासनिकअमरावती : जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास आता ही माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. त्याअनुषंगाने नासाच्या संकेतस्थळावर अमरावती विभागात आतापर्यंत ७५ टक्के वनकर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांनी जानेवारीमध्ये विभागीय वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनवणवा नियंत्रणाबाबत सूचना केल्या. या बैठकीत वनरक्षक ते मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यक्षेत्राची नोंदणी नासाच्या संकेतस्थळावर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. आता ही नोंदणी युद्धस्तरावर सुरू असून, वनवणवा नियंत्रणासाठी १५ फेब्रुवारी ते १५ जून २०२० या दरम्यान सजग राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. जंगल किंवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास वनकर्मचाºयांना मोबाइलवर ‘रियल टाइम डेटा’ मिळेल.वनवणवा नियंत्रणासाठी विभागीय, जिल्हा व तालुकास्तरावर आग प्रतिबंधक स्वतंत्र चमू तैनात आहे. आतापर्यंत जंगलातील आगीची माहिती डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण संस्था देत होती; पण ती आग लागल्यानंतर दोन ते अडीच तासांनी मिळायची. नासाकडून मात्र उपग्रहाद्वारे आगीची माहिती क्षणात मिळणार आहे.‘फायर मॅनेजमेंट मॅप’ तयारराज्याच्या वनविभागाने गत तीन वर्षांत जंगल, राखीव वनक्षेत्रातील आगींची दखल घेत ‘फायर मॅनेजमेंट मॅप’ तयार केला आहे. यात आगीची कारणे, नुकसानाची आकडेवारी, उपाययोजना, आगीनंतर दाखल गुन्हे, रस्ते, रोपवन, संशोधन प्लॉट, लाकूड डेपो, कूपवर्किंग, निरीक्षण कुटी आदी महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.जंगलातील आगीची माहिती तत्क्षण मिळेल, अशी सुविधा नासाने उपग्रहाद्वारे मोबाइलवर उपलब्ध केली आहे. आगीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल.- प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक, अमरावती.

टॅग्स :fireआग