शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नॅशनल डॉक्टर डे : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा भार २८ क्लासवन डॉक्टरांवर 

By उज्वल भालेकर | Published: July 01, 2024 12:10 AM

आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांची संख्या वाढविण्याची गरज...

अमरावती : वाढत्या नवनवीन आजारांमुळे डॉक्टरांचे महत्त्व अधिक दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण मात्र अजूनही संपलेले नाही. जिल्ह्यात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय वगळता एकूण २२ शासकीय रुग्णालय असून याठिकाणी ४६ क्लासवन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात अजूनही ही पदे पूर्णपणे भरलेली नसून १८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे फक्त २८ क्लासवन डॉक्टरांवरच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धुरा असल्याचे चित्र आहे. १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील मुख्यबिंदू असलेल्या डॉक्टरांची संख्या वाढविण्यावर शासनाने अधिक भर देण्याची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या मानांकानुसार १ हजार लोकसंख्येमागे किमान एक डॉक्टर असणे अपेक्षित आहे;परंतु जिल्ह्याची लोकसंख्या पाहता शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना आजही शासकीय रुग्णालयाशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे अशा या गरीब रुग्णांसाठी डॉक्टर हे एखाद्या देवापेक्षा कमी नाहीत. आजही ग्रामीण तसेच मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात वेळेत डॉक्टर मिळत नसल्याने रुग्णांना आपले प्राण गमावण्याची वेळ येते. एकीकडे विज्ञानाच्या या युगामध्ये विविध आजारांवर मात करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसेच राज्य सरकारने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा मोफत केल्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे; परंतु रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची पदेच सरकारने अजूनही पूर्णपणे भरलेली नाहीत. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या इतर डॉक्टरांवरील कामांचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये क्लासवन अधिकाऱ्यांची ४६ पदे आहेत. त्यातील २८ पदे भरली असून १८ रिक्त आहेत तर क्लास टू डॉक्टरांची १६१ पैकी १२७ पदे भरली असून ३४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही ठिकाणी क्लासवन अधिकाऱ्यांच्या जागेवर क्लास टू अधिकाऱ्यांकडे प्रभारी चार्ज देण्यात आल्याचे दिसून येते.

इर्विनमध्ये सर्वाधिक पदे रिक्तजिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) हे जिल्ह्यातील इतर रुग्णालयांसाठीचे रेफर सेंटर आहे; परंतु याच ठिकाणी वर्ग एक डॉक्टरांची २२ मंजूर पदांपैकी ९ पदे आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार रिक्त पदांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

दंत शल्यचिकित्सकांची १५ पैकी ९ पदे रिक्तजिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये दंत शल्यचिकित्सकांची एकूण १५ पदे मंजूर आहेत; परंतु यातील फक्त सहा पदेच भरण्यात आली असून ९ पदे रिक्त आहेत. डफरीन रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, धारणी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी उपजिल्हा रुग्णालय, धामणगाव ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय, वरुड ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा ग्रामीण रुग्णालय, चुरणी ग्रामीण रुग्णालय येथील दंत शल्यचिकित्सकांची पदे रिक्त आहेत. 

टॅग्स :doctorडॉक्टरAmravatiअमरावती