लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा व सत्र न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोेक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शुक्रवारी कर्मचाºयांनी विनोदी पथनाट्य सादर करून लोेक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकांची प्रलंबित प्रकरणे, धनादेश अनादरण, तसेच दिवाणी व फौजदारी अपिल व इतर दिवाणी प्रकरणे आदींचा निपटारा केला जाईल. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली सामान्य जनतेची प्रकरणे मार्गी लागतील. त्यामुळे या लोक अदालतीतील सहभाग वाढविण्याकरिता लोक अदालतीच्या व्यापक प्रसार व प्रचारासाठी शुक्रवारी न्यायालय परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले. न्यायालयातील कनिष्ठ लिपिक अजय कडू यांच्याद्वारे लिखित व गौरी क्रिएशनव्दारे निर्मित या पथनाट्यातून जागृती करण्यात आली. विनोदाचा आधार घेत पथनाट्यातून उपस्थिताना लोकअदालतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, शासकीय अभियोक्ता अधिवक्ता व पक्षकार उपस्थित होते.
पथनाट्यातून राष्ट्रीय लोकअदालतीचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 10:06 PM
जिल्हा व सत्र न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोेक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे९ सप्टेंबरला आयोेजन : रखडलेल्या प्रकरणांचा होणार निपटारा