अमरावती : देशाचा विकास, सामाजिक उत्तरदायित्वाच्या अनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. त्यानुसार सन २०१८-२०१९ या वर्षात नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाज सेवा करणारे विद्यापीठ, कार्यक्रम अधिकारी, समन्वयक, महाविद्यालय व स्वयंसेवकांना रासेयोचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुरस्कारार्थींची यादी जाहीर केली आहे.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे सर्वोत्कृष्ट ठरले आहे. याच विद्यापीठातील त्र्यंबक पाटील यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. विलास उगले (पुणे), दत्ता ढाले (देवधर, धुळे), रवि चेट्टीयार (मुंबई), प्रदीप चाफले (गडचिरोली) हे सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी ठरले. सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय, देवधर येथील कै.कर्म. डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, मुंबई भांडुप येथील रामानंद आर्या, डीएव्ही महाविद्यालय, गडचिरोलीच्या कोरची येथील वनश्री कला महाविद्यालयाला पुरस्कार जाहीर झाला आहे.
कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार मोर्शी येथील संदीप राऊत, औरंगाबाद येथील पंडित नलावडे, अहमदनगर नेवासा येथील संदीप तांबे, पुणे येथील समृद्धी मेथा, नाशिक येथील स्वानंग शुक्ल, परभणी येथील संजय पवार, सोलापूर येथील सुनील मठपती, सातारा येथील नीळकंठ शिंदे, ओंढा नागनाथ हिंगोली येथील दत्ता कुंचेलवाड, धायरी येथील मदन सूर्यवंशी यांना घोषित करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सत्यम देवकर (पुणे), किरण भांगे (अकलूज), कांचन चव्हाण (जळगाव), शे. तरन्नुम बेगम शे. शरीफ (पालम), देवानंद भालेराव (सासवड), विष्णू गोरे (कोल्हापूर), शुभम चाफले (नागपूर), अमित शिंदे (अमरावती), राजेश हजारे (चंद्रपूर), कीर्तिका सागर (मुंबई), सैयद सोहिल चांद पटेल (औरंगाबाद), राहुल खटकाळे (कोल्हापूर), हिमांद्री पंड्या (सांताक्रुझ), विशाल काळबांडे (परभणी), काजल चव्हाण (लोणेरे), आदित्य दारव्हटकर (धायरी, पुणे), आकाश देशमुख (पुणे), सूरज गुदडे (दापोली, रत्नागिरी) या विद्यार्थ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.