अमरावती : अमरावतीतील क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. रोहित शर्माची क्रिककिंगडम अकादमी आणि बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल यांनी अमरावती येथे शाळेतच एक अत्याधुनिक क्रिकेट अॅकेडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भामध्ये याद्वारे प्रथमच राष्ट्रीय दर्जाची अॅकेडमी सुरू होत आहे. या उपक्रमाचा उद्देश युवा क्रिकेटपटूंचा विकास करणे आणि शहरात सर्वोत्तम क्रिकेट वातावरण निर्माण करणे हा आहे. अकादमीसाठी १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान नोंदणी खुली राहील, तर प्रशिक्षणाचे सत्र १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. विशेष ऑफर अंतर्गत इच्छुक सहभागींना फ्री ट्रायल सेशन घेण्याची संधी १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दिली जाणार आहे. अॅकेडमीसाठी नोंदणी शुल्क फक्त १५०० रुपये आहे. अॅकेडमीतर्फे टी- शर्ट, ट्रॅक पॅन्ट्स, आणि कॅप सहभागींना दिली जाणार आहे. बिर्ला स्कूलबाहेरील सहभागींना मासिक शुल्क २६५५ रुपये आकारले जाईल, तर बिर्ला शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग मोफत दिले जाईल.
शाळेबाहेरील विद्यार्थी आणि इतर इच्छुकांचा सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ५.३० अशा दोन सत्रात सराव घेतला जाणार आहे. यामुळे त्यांना त्यांच्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येणार आहे.
बिर्ला शाळेने ४०,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे सुसज्ज मैदान उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये आधुनिक बॉलिंग मशीन आणि इतर सर्व आवश्यक क्रिकेट साहित्याचा समावेश आहे. या अॅकेडमीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील दोन अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, रोहित शर्मा स्वतः पुढील वर्षी अॅकेडमीला भेट देतील आणि सहभागींना मार्गदर्शन करतील. अमरावतीतील युवा क्रिकेटपटूंसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. याशिवाय क्रिककिंगडम आणि बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल सर्व प्रतिभावान विद्यार्थ्यांना रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांसाठी प्रोत्साहित करणार आहेत.
फक्त क्रिकेटच नाही, तर फुटबॉलप्रेमींसाठीसुद्धा सुवर्णसंधी बिर्ला स्कूलने निर्माण केली आहे. भारताचे सर्वात प्रतिभावान फुटबॉलपटू बायचुंग भूटिया, ज्यांचा सर्वाधिक गोल कारण्यामध्ये जगात मेस्सी आणि रोनाल्डोनंतर तिसरा क्रमांक लागतो, त्यांच्या फुटबॉल अॅकेडमीसोबतसुद्धा बिर्ला स्कूलने करार केला आहे. त्यामुळे फुटबॉलचेसुद्धा राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण बिर्ला स्कूलमध्ये मिळणार आहे.
दरम्यान, क्रिककिंगडम आणि बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल यांची ही संयुक्त भागीदारी अमरावती शहर व जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे, ज्यामध्ये त्यांची क्रिकेटविषयक रूची आणखी वाढत जाईल, हे निश्चित.
बिर्ला स्कूलमधील क्रिकेट अँकेडमी आणि फुटबॉल अॅकेडमी या अमरावतीच्या क्रीडाविश्वातील मैलाचा दगड ठरेल, ज्यामुळे अमरावतीमध्ये खेळाचे वातावरण निर्माण करून येथील खेळाडूदेखील राष्ट्रीय स्तरावर चमकतील, अशा भावना संस्थेचे अध्यक्ष सुधीर वाकोडे यांनी व्यक्त केल्या.