आंदोलनाचा इशारा : तालुका प्रशासनाला निवेदन धामणगाव रेल्वे : तीन वर्षांपासून सतत नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्यापही पीककर्जाचे पुनर्गठन न केल्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आत्महत्येची वेळ आली आहे. त्वरित पीककर्जाचे पुनर्गठन व नवीन कर्ज वाटपाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे़ तालुका प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे़तालुक्यात अठरा शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. मे महिना जवळ आला असताना शेतकऱ्यांजवळ वाहीपेरीकरिता पैसा नसल्याने शेतकरी चिंतेत आहे़ राज्य शासनाला या गंभीरबाबीकडे लक्ष द्यावे, थकीत कर्ज व चालू कर्जाचे त्वरित पुनर्गठन करून राष्ट्रीयीकृत बँका व को-आॅपरेटिव्ह बँकांनी कर्ज वाटप करावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बाजार समितीचे उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी पुढकार घेऊन तालुका प्रशासनाला निवेदन दिले आहे़ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा त्वरित मदतीची गरज असल्याने कर्जाचे पुनर्गठन न केल्यास आंदोलनाचा इशारा ठाकूर, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, शहराध्यक्ष विनोद तलवारे, रा.यु.क ाँ.चे तालुकाध्यक्ष मनोज शिवणकर, बाजार समितीचे संचालक नंदकिशोर ढोले, अनिल बगाडे, गणेश वाकेकर, विशाल भैसे, मोरेश्वर ठाकरे, विजय डुबे, प्रवीण राजनकर, रामदास शिवणकर, रत्नाकार ठाकरे, मंगेश ठाकरे, देवराव पारखंडे, देवानंद तेलंग, श्रीकृष्ण वाणी, मोहन पाचे, जितेंद्र शेंडे यांनी तहसीलदार श्रीकांत घुगे यांना निवेदनाद्वारे दिला.
पीक कर्जासाठी राष्ट्रवादी आक्रमक
By admin | Published: April 24, 2016 12:16 AM