अमरावती : विभागात खरिपाची ८० टक्के पेरणी झाली असली तरी कर्जवाटप मात्र २० टक्केच करण्यात आले आहे. जिल्हा बँकांनी शासनाच्या तंबीनंतर सावध पवित्रा घेत ३१ टक्के वाटप केले. राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत १० टक्केच वाटप झालेले आहेत. बँकांच्या असहकारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.यंदाच्या हंगामात विभागातील पाचही जिल्ह्यांमधील बँकांना ८,२८३.६१ कोटींचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्या तुलनेत बँकांनी सोमवारपर्यंत २ लाख ५ हजार २२८ शेतक-यांना १,६१७ कोटी ५० लाखांचे कर्जवाटप केले. ही १९.५७ टक्केवारी आहे. पीककर्ज वाटपात जिल्हा बँकांना २,२५६.३६ कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ७० हजार ६०४ शेतक-यांना १ लाख ७३ हजार ४८१ हेक्टरसाठी ७०६ कोटी ४ लाखांचे कर्जवाटप झालेले आहेत. ही ३१.२९ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक ६१.२८ टक्के कर्जवाटप बुलडाणा जिल्हा बँकेनी केलेले आहे. मात्र, अमरावती जिल्हा बँक सर्वाधिक माघारला आहे. या बँकेने आतापर्यंत फक्त २२.२० टक्केच कर्जवाटप केलेले आहे. अकोला जिल्हा बँक २०.५४, वाशिम जिल्हा बँक २३.४२, तर यवतमाळ जिल्हा बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत ५८.९२ टक्के कर्जवाटप केलेले आहेत.यंदाच्या पीककर्ज वाटपात राष्टीयीकृत बँका माघारल्या. या बँकांना सर्वाधिक ५,२६० कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ६० हजार ४५० खातेदारांना ५६५ कोटी ७० लाखांचे कर्ज वाटप केले. ही १०.७५ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक २४ टक्के वाटप यवतमाळ जिल्ह्यात झाले. तर सर्वात कमी ७ टक्के वाटप अकोला जिल्ह्यात झाले. अमरावती २१.१८ टक्के, वाशिम ७.४६ तर बुलडाना जिल्ह्यात १२.०९ टक्के कर्जवाटप करण्यात आले. ग्रामीण बँकांना ८२६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना ६ हजार ५५३ शेतक-यांना ५८.१० कोटींचे कर्जवोाप करण्यात आले. ही ७.७८ टक्केवारी आहे. शासन प्रशासनाच्या तंबीला बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतक-यांचा सवाल आहे.पश्चिम विदर्भात कर्जवाटपाची सद्यस्थिती (लाखांत)जिल्हा हेक्टर खातेदार कर्जवाटप टक्केवारीअमरावती २५,८२६ ३४,५३२ ३५००१.९२ २१.४७अकोला ३५,३३८ २५,१२२ १९३५७.६८ १४.५०वाशिम ३०,११८ २३,२३८ १८३७५.६७ १२.४६बुलडाणा ६,२०१ २९,५०८ २२०९३.२९ १२.६६यवतमाळ ७६,००८ ९२,८२८ ६६९२२.०० ३२.२०एकूण १,७३,४६१ २,०५,२२८ १६१७५०.५६ १९.५७
व-हाडाच्या कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:12 PM