नरेंद्र जावरे/श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा/धारणी : पुनर्वसित आदिवासी व वनविभागात मंगळवारी झालेल्या हल्ल्यात ६५ वनकर्मचारी व पोलीस गंभीर जखमी झाले होते. बुधवारी दिवसभर आदिवासींच्या अटकेसाठी पोलिसांचा अकोला व अमरावती जिल्ह्यातील ताफा कासोद शिरपूर या गावात ठाण मांडून होता. मात्र, मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यात सायंकाळी ७ वाजता झालेल्या दुसऱ्या संवादानंतर काही दिवस अटकसत्र थांबविण्याची मध्यस्थी करण्यात आली.मंगळवारी झालेल्या या गंभीर घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. नंतर बुधवारी सकाळी १० वाजता मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी चर्चा करून आदिवासींसोबत संवाद करण्यासाठी त्यांना पाठविले. त्यानुसार बुधवारी दुपारी ३ वाजता राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, छोटू तेलगोटे, राजेश सेमलकर, देविदास कोगे, अमोना कासोदचे सरपंच मदन बेलसरे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार, धारणीचे उपविभागीय अधिकारी राहुल कर्डिले, उपाविभागीय पोलीस अधिकारी सोयम मुंडे, अकोटचे उपविभागीय अधिकारी राजपूत, अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे, चिखलदराचे तहसीलदार प्रदीप पवार, अकोटचे मंडळ अधिकारी एम.जी. काळे यांनी अमोना कासोद येथे सुमारे ४०० आदिवासींसोबत संवाद साधला. त्यांच्या घटनेबद्दल माहिती घेतली व त्यांनी काही मागण्या राजकुमार पटेल यांच्या पुढे ठेवल्या. त्यानंतर पुन्हा कासोद शिरपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बैठक घेऊन तूर्तास अटकसत्र थांबविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी उशिरा मारहाणीत जखमी आदिवासींवर तेथेच उपचार करण्यात येत आहेत.चंपालाल बेठेकर जखमीचंपालाल लाभू बेठेकर या गंभीर जखमीने वनकर्मचाºयांनी आपल्यावर चार फायर केल्याचे म्हणणे आहे. तो गंभीर जखमी अवस्थेत जंगलात पडून होता. त्याला रात्री एक वाजताच्या दरम्यान सहकाºयांनी अमोना कासोदा येथे आणले. मागील २४ तासांपासून तो उपचाराविना पडून होता. राजकुमार पटेल यांनी भेट दिल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णवाहिकेत उपचारार्थ पाठविण्यात आले.वनाधिकारी बेपत्ताशिवपूर कासोद या गावाला दिवसभर पोलीस छावणीचे स्वरूप होते. क्यूआरटी, एसआरपीएफ, आरपीटीएम, अकोला व अमरावती जिल्ह्यातील पोलीस ताफा असा एकूण ५०० कर्मचाºयांचा ताफा अमोना कासोद व त्यानंतर कासोद शिरपूर येथे तैनात करण्यात आला होता, तर दीडशे कर्मचाºयांचा ताफा जंगलात तैनात करण्यात आला होता वन विभागा बद्दल आदिवासींमध्ये प्रचंड संताप दिसून आला. दिवसभर मध्यस्थीदरम्यान वनविभागाचा एकही अधिकारी नव्हता. यावेळी संपूर्ण जबाबदारी महसूल व पोलिस विभागावर दिसून आली.आदिवासींच्या मागण्याआदिवासींची जप्त केलेली कागदपत्रे परत करा. पुनर्वसन रकमेतून कापलेले दीड लाख परत द्या. शेतीचा मोबदला द्या. पुनर्वसित ठिकाणी पायाभूत सुविधा द्या. जप्त केलेली भांडीकुंडी, दुचाकी परत द्या आदी मागण्या आदिवासींनी नोंदविल्या आहेत.प्रत्येक वनपरिक्षेत्रातून २५ कर्मचारी पाचारणपुनर्वसित आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने प्रत्येक वनपरिक्षेत्रातून २५ वनकर्मचारी बोलावले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यादरम्यान केलपानी येथील आदिवासींच्या बेपत्ता झालेल्या नातलगांचा आधी शोध घ्या, अशी मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी प्रकर्षाने नोंदवली. यामध्ये प्रामुख्याने मुले व वृद्धांचा समावेश आहे.मुख्य सूत्रधार चंपालाल बेठेकर याला अटक केली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे अटकसत्र सुरू आहे- दिलीप झळके, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकअमरावती
शिरपूर कासोदला पोलीस छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:48 PM
पुनर्वसित आदिवासी व वनविभागात मंगळवारी झालेल्या हल्ल्यात ६५ वनकर्मचारी व पोलीस गंभीर जखमी झाले होते. बुधवारी दिवसभर आदिवासींच्या अटकेसाठी पोलिसांचा अकोला व अमरावती जिल्ह्यातील ताफा कासोद शिरपूर या गावात ठाण मांडून होता.
ठळक मुद्देवनविभागाबद्दल आदिवासींमध्ये प्रचंड संताप : राजकुमार पटेल यांची यशस्वी मध्यस्थी