परतवाडा : मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना अटक करण्यासाठी मंगळवारी न्यायालय परिसर व बाहेर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी होती. ती आता ११ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी एकच गर्दी केली होती.धारणी तालुक्यातील खारी येथे काकाने पुतण्याची हत्या केली होती. यावेळी आरोपी काकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा राजकुमार पटेल व मेठ्या प्रमाणात आदिवासींवर पोलिसांनी दाखल केले. यात समर्थक व नातेवाइकांना सूडभावनेने गोवण्यात आल्याचा आरोप राजकुमार पटेल यांनी केला आहे.समर्थकांची तोबा गर्दीअटकपूर्व जामिनासाठी पटेल यांनी अचलपूर न्यायालयात अर्ज केल्यावर त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून ९ जानेवारी ही तारीख देण्यात आली. त्यानुसार जमिनावर सुनावणी ठेवण्यात आली होती. आता राजकुमार पटेल यांच्या जामिनावर ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे. मंगळवारी त्यांना जिल्हा न्यायाधीश क्रमांक ३ ए.के. शाह यांनी एक आरोपी अनुपस्थित असल्याने पुढची तारीख दिली. राजकुमार पटेल यांना न्यायालयाने जामिन नाकारताच अटक करण्यासाठी पोलिसांची मोठी फौज मंगळवारी अचलपूर न्यायालय परिसर व बाहेर लावण्यात आली होती. धारणी, परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा, एलसीबीचे ठाणेदार, धारणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेऊल यांच्या नेतृत्वात गणवेशधारी व साध्या वेशातील कर्मचारी मूत्रिघरापासून तर पूर्ण परिसरात तैनात होते. विशेष कमांडो पथक न्यायालयाबाहेर सज्ज होते. जामीन न मिळाल्यास पळून जाऊ नये, याकरिता हा ताफा लक्ष ठेवून होते. दुसरीकडे पटेल समर्थकांची गर्दी होती.चोरटा पळालापोलिसांचा ताफा बघताच तारखेवर आलेल्या चोरट्याने पळ काढला. एखाद्या दुचाकीच्या गुन्ह्यात आपणास पुन्हा अटक करण्यासाठी पोलीस आल्याचा भास त्याला झाला आणि त्याने पळ काढल्याने न्यायालय परिसरात एकच खसखस पिकली.
अचलपूर न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:18 AM
मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना अटक करण्यासाठी मंगळवारी न्यायालय परिसर व बाहेर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता.
ठळक मुद्देसमर्थकांची गर्दी : राजकुमार पटेलांच्या जामिनावर ११ ला सुनावणी