अमरावती : संघर्ष सामाजिक संघटनेचा मोर्चा येणार असल्याची गाडगेनगर पोलिसांनी माहिती होती. त्यामुळे दंगा नियंत्रक पथक व पोलिसांचा कडक बंदोबस्त गाडगेनगर पोलिसांनी ठेवला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप शुक्रवारी प्राप्त झाले होते. मात्र, नियोजित मोर्चा आलाच नाही. त्यामुळे पोलीस रिलॅक्स झाले. त्यानंतर एका रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात एका शिष्टमंडळाने मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली.
अमरावती ते आसरा मार्गाचे निकृष्ट बांधकाम करून केलेल्या भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून संबधित कंपनीला ब्लॅक करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शुक्रवारीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेशरमचे झाडे लावण्यात येणार होते. मात्र, पवित्र सण असल्यामुळे ते स्थगित करण्यात येणार असून १७ ऑगस्ट रोजी बांधकाम विभागात आंदोलन करून बेशरमचे झाड लावण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी सागर गवई, चंद्रशेखर थोरात, मनोज थोरात, देविदास मोरे, शिवाजी अब्रुक, केशव वानखडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची होती.