शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

Navneet Rana: मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान, घरातही शिरले पाणी, नेत्यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 4:47 PM

मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे

मुंबई - मुंबईसह राज्यातीस अनेक भागात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अमरावतीच्या तिवसालगत असलेल्या पिंगळाई नदीला पूर आलाय. या पुराच्या तडाख्यात अनेक घरे जलमय झालेत. नागरिकांच्या घराचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, येथील लोकप्रतिनिधींनी तिवसा येथील घरांची पाहणी केली. 

मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर, हजारो हेक्टरवरील शेतीदेखील पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तिवसा मतदार संघातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान पूरस्थितीमुळे अनेकजण बेघर झाले असून उपासमारीची वेळ पूरग्रस्तांवर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात जाऊन पूरग्रस्त भागची पाहणी केली आहे. याशिवाय अमरावतीच्या अनेक भागात नुकसान असल्याने  खासदार अनिल बोंडे हे देखील पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करीत पीडितांना दिलासा देत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे हे नुकसान असल्याने नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि लोप्रतिनिधींकडून करण्यात येते आहे. 

टॅग्स :Rainपाऊसnavneet kaur ranaनवनीत कौर राणाYashomati Thakurयशोमती ठाकूर