शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

नवनीत राणा यांचा ऐतिहासिक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:39 AM

अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही राज्यात लक्षणीय ठरली. माजी कें द्रीय अर्थराज्यमंत्री तथा चारवेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्याशी साधलेला हा संवाद.

ठळक मुद्देपालकमंत्री प्रवीण पोटे यांना मोठा धक्का । अपक्ष उमेदवाराने चारली भाजपला धूळमतभेद नव्हे तर आता विकासाचे राजकारण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती:अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही राज्यात लक्षणीय ठरली. माजी कें द्रीय अर्थराज्यमंत्री तथा चारवेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्याशी साधलेला हा संवाद.प्रश्न : मोदी लाट कायम असताना तुमच्या विजयाचे सूत्र काय ?उत्तर : अमरावती जिल्ह्यातील मतदारांना लोकसभेत बदल अपेक्षित होता. तसेही मी गेल्या नऊ वर्षांपासून मतदारांच्या सतत संपर्कात आहे. विजयी झाली तर जनतेचे प्रश्न, समस्या सोडविणार, असा शब्द दिला आहे, तो मी पूर्ण करणारच. शरद पवार आणि मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणारच. विरोधकांनी सुद्धा प्रत्यक्ष- अप्रत्यपणे निवडणुकीत सहकार्य केले आहे. ही बाब सुद्धा विजयासाठी पूरक ठरली.निवडणूक चिन्ह बदलल्याने काही फरक पडला?लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी टीव्ही चिन्हावर निवडणूक लढणार, असे स्पष्ट होते. मात्र, निवडणूक म्हटले की राजकारण आले. त्यानुसार विरोधकांनी खेळी खेळली. टीव्हीऐवजी पाना चिन्ह मिळाले. यात फारसा फरक पडला नाही. परंतु, काही दिवसातच घराघरात पाना पोहचला. निकाल सुद्धा माझ्याच बाजुने लागला. त्यामुळे देव बरोबर करते, असे म्हणावे लागेल.आनंदराव अडसूळ यांच्याशी आता राजकीय वैर संपले का?मी राजकारणाला फार महत्व देत नाही. खरे तर समाजकारण हेच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे मातब्बर असलेल्या आनंदराव अडसुळांचा मतदारांच्या साक्षीने पराभव झाला. अडसूळ हे माझे वडिलधारी समान आहे. त्यांचे चरणस्पर्श करुन मी आशीर्वाद घेईल. त्यांच्या मार्गदर्शनात विकासकामे मार्गी लावेल. ती मोठी व्यक्ती असून, माझ्यासाठी परमआदरणीय असतील. त्यामुळे त्यांच्याशी राजकीय वैर येण्याचा प्रश्नच नाही.रिंगणात २० अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजन झाले काय?विरोधकांनी २० अपक्ष उमेदवार रिंगणात उभे करुन मतविभाजनाची खेळी केली. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (गवई गट) हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद मिळाले. युवा स्वाभीमान पार्टीचे जाळे होते. मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मतविभाजन टळले.निवडणूक काळात दिलेले आश्वासन कसे पूर्ण करणार?निवडणूक काळात प्रचारादरम्यान दिलेले आश्वासन आजही मला ज्ञात आहे. जिल्हा, तालुका, गावांमध्ये कोणते प्रश्न, समस्या आणि विकासकामे करायची आहे, ते मी पूर्ण करणारच. मतदारांनी टाकलेला विश्वास विकासकामातून सिद्ध करेन.जिल्ह्यात कोणत्या विकासकामांना प्राधान्य दिले जाईल?बेलोरा विमानतळ, चिखलदरा पर्यटनाचाविकास, बडनेरा येथील वॅगन दुरूस्ती कारखाना लवकरच पूर्ण करून रोजगाराची निर्मिती केली जाईल. शरद पवार, रवि राणांच्या मार्गदर्शनात ती पूर्ण होतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल