शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

नवनीत राणा यांनी सीपींकडे सोपविले अडसुळांविरुद्धचे पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:48 PM

खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरुद्धचे पुरावे नवनीत राणा यांनी सोमवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोपविले. तत्पूर्वी, नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा नेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरुद्धचे पुरावे नवनीत राणा यांनी सोमवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोपविले. तत्पूर्वी, नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा नेला होता.नवनीत राणा व महिला कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराच रोखण्यात आले. यानंतर काही महिला कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची भेट घेतली. खा. अडसुळांनी आ. रवि राणा यांना राजकारणातून संपविण्यासाठी व स्वत:चे राजकीय वर्चस्व जोपासण्यासाठी षड्यंत्र रचल्याचे नवनीत राणा यांनी सीपींना सांगितले. खा. अडसुळांच्या सांगण्यावरून जयंत वंजारी, सुनील भालेराव व कार्तीक शहा यांनी मला शिवीगाळ करून ब्लॅकमेल केले आणि खंडणी मागितली. याशिवाय चारित्र्यहीन हा शब्द वापरला. हा प्रकार महिलांची बदनामी करणारा असून, त्यांनी अमरावतीमधील समस्त महिलांचा अपमान केल्याचे त्यांनी सीपींना सांगितले. ब्लॅकमेलिंग, धमकी, शिवीगाळ व खंडणी वसुली, दस्तावेजांची हेराफेरी यासंदर्भातील सर्व पुरावे, याशिवाय कॉल रेकॉडिंग, सीडी, व्हिडीओ क्लिप, आॅडिओ क्लिप, फेसबूक क्लिप, व्हॉट्सअ‍ॅप डेटा, नवनीत राणा यांच्या बाजूने लागलेल्या निकालाची प्रत तसेच तब्बल १२३ एकत्रित कॉलचे डिटेल्स नवनीत राणा यांनी सीपी बाविस्कर यांच्याकडे सोपविले. हे सर्व पुरावे तपासून खा. अडसुळांसह त्यांच्या सहकार्यांवर कठोर कारवाई करावी, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.डीसीपी सातव करणार अडसुळांच्या तक्रारीची चौकशीखा. आनंदराव अडसूळ यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडे सोपविली आहे. ते योग्य व पारदर्शक तपास करून अहवाल सादर करतील, त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती बाविस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.पोलीस उपायुक्तांची धावपळशिवसैनिक व महिलांचा एकापाठोपाठ मोर्चा पोलीस आयुक्तालयावर धडकला. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असतानाही अनेक कार्यकर्ते पोलीस आयुक्तांच्या दालनापर्यंत पोहोचले. आयुक्तांच्या कक्षात शिरण्याचा अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्यांना मज्जाव केला. या बंदोबस्ताची धुरा सांभाळताना डीसीपी शशिकांत सातव व प्रदीप चव्हाण यांची चांगलीच तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी नियोजन करताना पोलीस उपायुक्त धावपळ करीत होते.पोलीस आयुक्तांनी माध्यमांना टाळलेखा.अडसूळ व नवनीत राणा यांनी एकापाठोपाठ सीपींची भेट घेतली. शहरातील ही मोठी घडामोड होती. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींना कटाक्षाने आयुक्तांच्या दालनात प्रवेश नाकारण्यात आला. दोन्ही पक्ष गेल्यावर माध्यम प्रतिनिधी सीपींची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेले. त्यावेळी अगदीच जुजबी उत्तर देत, टेबलवर हात आपटून, स्वत:ची खुर्ची त्यांनी दूर सारली. त्यांच्या या देहबोलीमुळे आणखी काही न विचारता प्रतिनिधी बाहेर पडले.नवनीत राणांच्या तक्रारीची चौकशी करणार डीसीपी निवा जैनपोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी नवनीत राणा यांच्या तक्रारीची चौकशी पोलीस उपायुक्त निवा जैन यांच्याकडे सोपविली आहे. नवनीत राणा यांनी दिलेल्या पुराव्यातील तथ्यांचा अभ्यास करून दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती बाविस्कर यांनी दिली.दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवेदन देऊन आपआपल्या तक्रारी दिल्या. पारदर्शकतेने तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल. डीसीपी शशिकांत सातव व निवा जैन यांच्याकडे चौकशी सोपविली आहे.- संजयकुमार बाविस्करपोलीस आयुक्त.