शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

२७ हजार हेक्टर क्षमतेचे १८ सिंचन प्रकल्प अधांतरी

By admin | Published: November 29, 2014 12:18 AM

जिल्ह्यात राज्य शासनाने सन २००४ ते २००९ या सहा वर्षांच्या कालावधीत आठ तालुक्यांतील १८ प्रकल्प सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली होती.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात राज्य शासनाने सन २००४ ते २००९ या सहा वर्षांच्या कालावधीत आठ तालुक्यांतील १८ प्रकल्प सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यामध्ये निम्नपेढी या मोठ्या प्रकल्पांसह तीन मध्यम व १४ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.या प्रकल्पांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता न दिल्याने २७ हजार २१८ हेक्टरचे सिंचन क्षेत्र सुजलाम् सुफलाम् होण्यापासून अद्यापही कोसोदूर आहेत. या अधांतरी पडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून अमरावतीसह विदर्भातील सिंचन अनुशेषाच्या मुद्यावर वादळ उठत आहे. या सिंचनाच्या अनुशेषामध्ये सर्वाधिक सिंचनाचा अनुशेष विशेषत: अमरावती जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील निम्नपेढी सिंचन प्रकल्पाला सन २००४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुमारे १६१.१७ कोटी रूपयांच्या सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी देऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र ११ वर्ष लोटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी खारपाणपट्ट्यातील शेती केवळ सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे विकासापासुन दूर आहे.त्यानंतर चांदूरबाजार तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पाला सन २००६ मध्ये मंजुरी दिली. शासनाने या कामासाठी सुमारे १००.८० कोटी रूपयांची प्रशासकीय मंजुरी त्यावेळी देण्यात आली. अशाच प्रकारे अमरावती तालुक्यातील पेढी बॅरेज प्रकल्पाला सन २००८ मध्ये मंजुरी देऊन या प्रकल्पाच्या ६२.७७ रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र या प्रकल्पांची कामे अपूर्ण स्थितीत आहेत. घुगंशी बॅरेज प्रकल्पसुध्दा २००८ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीच्या कामाला त्यावेळी १७०.१५ कोटी रूपये किमतीचा हा प्रकल्प सद्यस्थितीत सुमारे ३८९.९१ कोटी रूपयांपर्यंत पोहचला आहे. याशिवाय तिवसा तालुक्यातील शिवणगाव लघु प्रकल्पाला सन २००९ मध्ये ६.५४ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. आता हा लघु प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे कामे रखडली व प्रकल्प १६.३७ कोटी रूपये किमतीने वाढला आहेत. वरूडमधील निम्नचारघड १११.१३ कोटी, नागठाणा ३२.५२, भिमंडी १४.२७ झटामझिरी १०.९०, पवनी ५.७४, बहादा ७.५३ कोटी रूपयाचे हे सहा लघु प्रकल्प भूसंपादन , वनजमिनी, बुडीतक्षेत्र, माती आणि सुप्रमा आदी विविध कारणांमुळे अडचणीत सापडले आहेत. परिणामी या प्रकल्पाची काही कामे अर्धवट स्थितीत तर काहींची कामे सुरूही होऊ शकली नाहीत, ही शोकांतिका आहे.