अमरावती : मानवाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना शेतजमिनीवर दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढत असलेला वापर यावरही नियंत्रण ठेवणे पर्यावरणासाठी तेवढेत महत्त्वाचे आहे पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी शासनामार्फ त विविध योजना राबविल्या जातात. यासाठी विविध शासकीय कार्यालयाना जबाबदार्या देण्यात आल्या आहेत मात्र ही जबाबदारी सर्वांची आहे. प्रदूषण विरहित पर्यावरणाचा समतोल रोखणार्यांपैकीच एक म्हणजे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आहे . जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बाधित झालेले पर्यावरण नियंत्रणात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. त्याच अनुषंगाने पाण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत काही उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. रासायनिक खतावर नियंत्रण आवश्यकदिवसेंदिवस शेतजमिनीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने जलस्तोत्रामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते. परिणामी पाणी हे दूषित होऊन ते आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे पर्यावरणाचा उद्देश साध्य करण्यासाठी व रासायनिक खताच्या माध्यमातून वाढत असलेले पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण रोखण्याकरिता यावर नियंत्रण मिळविणे काळाची गरज आहे.सेंद्रिय खताचा वापर गरजेचाजलस्तोत्रातून निर्माण होणारे प्रदूषण हे रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे होते. जमिनीच्या मुळापर्यंत रासायनिक खताचे अंश पोहोचत असल्याने जलस्तोत्रात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. पॅरामीटरच्या धोरणानुसार पाण्यातील नायट्रेटचे आवश्यक तेवढे प्रमाण न राहता ते वाढत जाते. त्यामुळे असे पाणी पिल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे.
रासायनिक खताच्या वापरावर नियंत्रणाची गरज
By admin | Published: June 04, 2014 11:22 PM