अमरावती : शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शुक्रवारी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्यात. नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. पीआय प्रवीण काळे हे नांदगाव पेठचे ठाणेदार असतील.
कल्याण शाखेतील पोलीस निरीक्षक रमेश ताले हे भातकुलीचे ठाणेदार, तर गोरखनाथ जाधव हे वलागावचे ठाणेदार असतील. विशेष शाखेच्या नीलिमा आरज या शहर कोतवालीच्या, तर राहुल आठवले फ्रेजरपुरा, पुंडलिक मेश्राम यांना नागपुरी गेटचे ठाणेदार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल कुरळकर शहर वाहतूक शाखा, प्रवीण वांगे गाडगेनगर, किशोर शेळके विशेष शाखेत, विजय वाकसे महिला सेल, देवेंद्रसिंग ठाकूर यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये प्रमोद साळोखे आर्थिक गुन्हे, शाखेत, शीतल हेरोळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात, पूजा खांडेकर कोतवालीत, तर सोनू झामरे यांना खोलापुरी गेट ठाण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षकांमध्ये पंकज ढोके व राजश्री चंदापुरे यांना गाडगेनगरमध्ये, मुदतवाढ देण्यात आली. किसन मापारी फ्रेजरपुरा, प्रदीप होळगे खोलापुरी गेट, बालाजी वळसणे शहर कोतवालीत, तर बडनेरा ठाण्यात कार्यरत उमेश मारोडकर यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे.